JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Osho : ओशोंच्या पुण्यतिथीला माळेवरुन महाभारत! भक्तांचं आश्रमाबाहेर आंदोलन, Video

Osho : ओशोंच्या पुण्यतिथीला माळेवरुन महाभारत! भक्तांचं आश्रमाबाहेर आंदोलन, Video

Osho Death anniversary : आचार्य रजनीश म्हणजेच ओशो यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुण्यातील आश्रमाच्या बाहेरचं वातावरण चांगलंच तापलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 जानेवारी : आचार्य रजनीश म्हणजेच ओशो यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुण्यातील आश्रमाच्या बाहेरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. ओशोंना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भक्तांना  समाधीस्थळी जाण्यास आश्रमाकडून रोखण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयानं ओशो भक्तांना दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यानंतरही ओशो इंटरनॅशन फांऊडेशननं हा प्रवेश रोखल्याचा आरोप ओशोंचे भक्त स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला. नेमकं काय घडलं? ओशोंच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील ओशो भक्त पुण्यात जमा झाले होते. त्यांना ओशोंनी दिलेली माळ घालून आश्रमात जाण्यास आश्रमाच्या व्यवस्थापनानं रोखल्याचा आरोप स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला. या आश्रमात न्यू इयर फेस्टिव्हल, मान्सून फेस्टिव्हल होतो. पण, ओशोंशी संबंधित त्यांच्या जन्माचा आणि पुण्यतिथीचा फेस्टिव्हल होत नाही. ते कार्यक्रम देखील या आश्रमात व्हायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. ओशोंनी 1989 साली केलेल्या एका वक्तव्याचा आधार देत आश्रम व्यस्थापकांनी आम्हाला प्रवेश दिला नाही. पण, ओशोंनी त्याबाबत 1989 पूर्वी आणि नंतरही वक्तव्य केलं आहे. माळ घालून आश्रमात प्रवेश करण्यात ओशोंनी परवानगी दिली होती, असा दावाही स्वामी प्रेम प्रशांत यांनी केला. Osho Ashram: 11 वर्षांनी उठली 500 शिष्यांवरची बंदी, आश्रमप्रवेशाचा मार्ग मोकळा काय आहे वाद? ओशो यांचा जन्म आणि मृत्यू भारतामध्ये झाला. त्यांनी आयुष्याचा बराच काळ भारतामध्येच घालवला. त्यानंतरही ओशोची बौद्धीक संपदा तसंच ट्रस्टची मालकी ही पाश्चिमात्यांकडे आहे. ओशो इंटरनॅशनलचं मुख्यालय देखील झुरीचमध्ये आहे. त्यांनाच या सर्व गोष्टींचा लाभ मिळत आहे. यामधूम मिळणारा सर्व पैसा हा भारताच्या बाहेर नेला जात असून भारतामधील ओशो आश्रमांना यामधून काहीही लाभ होत नाही,’ असा दावा ओशोंच्या भक्तांचा आहे.

या प्रकरणात धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यावेळी त्यांनी भारतीय व्यवस्थापनाला फक्त नामधारक ठेवत आपल्या हाताचं बाहुलं बनवलं आहे. ओशोंनी आम्हाला माळ दिली आहे. ती घालू नये अशी बंधनं घालणारे हे विदेशी कोण आहेत? असा सवाल या भक्तांनी विचारला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या