JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात 'नाईट कर्फ्यू'च्या पहिल्याच दिवशी व्यापारी संघटनेनं केली नवी मागणी

पुण्यात 'नाईट कर्फ्यू'च्या पहिल्याच दिवशी व्यापारी संघटनेनं केली नवी मागणी

NIght Curfew : पुण्यात (Pune City) 8 वाजेनंतरही रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत होते. तसंच काही ठिकाणी दुकानेही सुरू होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 28 मार्च : राज्यात आज रात्री 8 वाजेपासून संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यूची (Night Curfew) अंमलबजावणी सुरू झाली. मात्र पहिलाच दिवस आणि त्यात रविवारची सुट्टी यामुळे पुण्यात (Pune City) 8 नंतरही रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत होते. तसंच काही ठिकाणी दुकानेही सुरू होती. पहिलाच दिवस असल्याने पोलिसांनीही लोकांना आणि दुकानदारांना विनंती, आवाहन करण्याचा पवित्रा घेतला. पुणे व्यापारी असोसिएशनने 8 ऐवजी 9 वाजता दुकाने बंद करायला परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. याचं कारण सांगताना दुकानाचे शटर बंद करून आवराआवर करण्यात 40 ते 50 मिनिटं लागतील म्हणत 9 पर्यंत मुभा द्यावी असं म्हटलं आहे. आता या मागणीवर शासन ,प्रशासन काय भूमिका घेते, कसा प्रतिसाद देते हे बघावं लागेल. पुणे व्यापारी असोसिएशनचे 40 हजार सदस्य आहेत. असोसिएशनचे प्रमुख फत्तेचंद रांका यांनी प्रशासनाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. हेही वाचा - पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : संकष्टी चतुर्थीला गणेश मंदिरे बंद राहणार, शिवजयंतीही साधेपणाने होणार साजरी रात्री 8 वाजता लाईट ऑफ, शटर खाली अशी उद्घोषणा पोलीस करत आहेत. यामुळं व्यापाऱ्यांमध्ये भीती ,संभ्रम आहे असं रांका यांनी पत्रात नमूद केलं आहे. एकूणच आता कुठं व्यापार पूर्व पदावर येतोय अशात कडक निर्बंध लादले तर अधिक नुकसान होईल असं व्यापाऱ्यांना वाटत आहे. लग्न समारंभ ,साखरपुडा, सांस्कृतिक कार्यक्रम यावर आधीच निर्बंध आहेत यामुळं सर्व प्रकारचे व्यापारी वैतागले आहेत. सरकारी कार्यालये, हॉटेल्स ,नाट्य गृहे,चित्रपट गृहे इथं 50 टक्के हजेरी आणि लग्न समारंभात 50 जण यामागे लॉजिक काय असा सवाल व्यापाऱ्यांचा आहे. लॉकडाऊन नकोच अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. गेल्या वर्षी आधी लॉकडाऊन करा असा पुढाकार घेणारे व्यापारी नंतर मात्र लॉकडाऊनला वैतागले होते. आता वर्ष भरानंतर लॉकडाऊन पाहिजे असं कुणीच म्हणत नाही. कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत, प्रादुर्भाव वाढतोय आणि दुसरी लाट असल्याने सरकारकडेही पर्याय कमी आहेत. सरकारलाही लॉकडाऊन नकोय म्हणून आधी नाईट कर्फ्यू,संचारबंदी ,जमावबंदी याचं उल्लंघन करणारे, मास्क न घालणारे , शारीरिक अंतर न पाळणारे यांच्या वर कारवाई, जास्तीत जास्त चाचण्या ,वेगवान लसीकरण यावर सरकार भर देतं आहे. पण रुग्ण संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊनची टांगती तलवार कायम आहे. एकूणच इकडं आड तिकडं विहीर या म्हणीप्रमाणे इकडं कोरोना तिकडं लॉकडाऊन अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या