JOIN US
मराठी बातम्या / पुणे / kasaba bypoll election : टिळकांच्या वाड्याला नकार, कसब्यातून भाजपकडून नवीन उमेदवार जाहीर

kasaba bypoll election : टिळकांच्या वाड्याला नकार, कसब्यातून भाजपकडून नवीन उमेदवार जाहीर

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी तिकीट देण्याचं टाळलं आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीवरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पश्चात उमेदवारी कुणाला मिळणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेरीस टिळक यांच्या घरी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आहे. टिळक यांच्या कुटुंबातून मुक्ता टिळक यांचे पती इच्छुक होते. पण, त्यांना नकार देण्यात आला आहे. (उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा) विशेष म्हणजे, कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट फायनल व्हायच्या आधीच कुणाल टिळक यांची कालच प्रवक्तेपदावर नियुक्ती झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. कुणाल टिळक हे मुक्ता टिळक यांचे पूत्र आहेत.  तसंच शुक्रवारी रात्री टिळक वाड्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. त्यानंतर आता उमेदवारांची नाव जाहीर झाली आहे. त्यामुळे आता टिळक वाड्यालाच फक्त प्रवक्तेपदावर समाधान मानावं लागणार आहे. (निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मोठी घोषणा) तर कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झालं आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने असा सामना रंगणार आहे. तर  चिंचवड विधानसभा मतदासंघातून भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर  महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कांटे की टक्कर पाहण्यास मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या