अजित पवार
बारामती, 1 मे : आज राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. बारमतीच्या प्रशासकीय भवनात महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांनी ध्वजारोहन केलं. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मात्र यावेळी एक किस्सा घडला आहे. अजित पवार बोलत असताना अचानक त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. ज्या चिठ्ठीमध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरांच बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली होती. या चिठ्ठीला अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.
नेमंक काय म्हणाले अजित पवार? अजित पवार बोलत असताना त्यांना मोकाट कुत्री आणि जनावरांचा बंदोबस्त करा असं निवेदन देण्यात आलं. त्यावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली. मला बारामतीकरांनी सालगडी म्हणून ठेवलं आहे. आता साहेबांना सांगतो तुम्ही कुत्र्यांचे बघता की जनावरांच. जर साहेब म्हणाले की मी जनावरांचं बघतो तर मी कुत्र्यांचं बघतो. सुप्रिया सुळे यांना म्हणतो की तुम्ही अजून काही तर बघा. असे हे काय सुरूये, बास करा आता. मोकाट जनावरांचा कोंडवाडा करा आणि दंड करा. कुत्र्यांची नसबंदी करा आता तसाही भाद्रपद महिना आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. …तर राज्यात पुन्हा कधीच युतीचं सरकार आलं नसतं; केसरकरांच्या गौप्यस्फोटानं खळबळ अजित पवारांच्या पोलिसांना सूचना दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत. बारामतीमध्ये मी वेडे वाकडे प्रकार मी खपवून घेणार नाही. माझ्या जवळचा जरी वेडा वाकडा वागत असेल तर हायगय करू नका. सगळ्यांना नियम सारखे आहेत. ते जरी अजित पवारांचे कुटुंब असले तरी देखील नियम सारखेच असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.