JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे ग्रामीणमध्ये कशी आहे लॉकडाऊनची अंमलबजावणी, जाणून घ्या गावा-गावातील स्थिती

पुणे ग्रामीणमध्ये कशी आहे लॉकडाऊनची अंमलबजावणी, जाणून घ्या गावा-गावातील स्थिती

जुन्नर, खेड, चाकण व आळंदी या प्रमुख 4 नगर परिषद क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 जुलै : खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने पाच पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गाव व शहरातील परिसराला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ज्या शहर व गावात पाच पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून उद्यापासून पुढील दहा दिवस जाहीर करण्यात येत असून औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे. तर शेती संबंधित खते औषधांची दुकाने 5 दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधीकारी संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली जुन्नर,खेड, चाकण व आळंदी या प्रमुख 4 नगर परिषद क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने ही चारही शहरे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या शहरांमध्ये दूध वितरण व वैद्यकीय सेवा बँक वगळता सर्व दुकाने, रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये औद्योगिक वसाहत सुरू राहणार असून या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात येणार असून कंपन्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे,सॅनिटाइझ करणे या सर्व गोष्टींची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. अशा नियमावलीसह औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे. खेड तालुका-21 गावं (3 नगरपालिका 18 गावे-पूर्ण: कंटेन्मेंट झोन,एकूण 57 गावं बाधित आहेत.बँक,शासकीय कर्मचारी,वैद्यकीय सेवा मात्र सुरू राहतील. चाकण भागातील औद्योगिक वसाहत मात्र सुरू राहणार आहे. इतर गावात गटविकास अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. मात्र ज्या गावात एकही रुग्ण सापडला नाही तिथे दुपारी दोन नंतर संचारबंदी राहील. जुन्नर-आंबेगाव तालुक्याचा प्रभारी प्रांताधिकारी म्हणून संजय तेली यांच्याकडे पदभार असल्याने या विभागाबद्दल सुद्धा त्यांनी माहिती देताना सांगितले की, जुन्नर तालुक्यात एकूण 23 गावे पूर्णतः कंटेन्मेंट झोन घोषित असून जुन्नर नगरपालिकेला सुद्धा 23 तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. आंबेगाव तालुक्यातील 10 गावे पूर्णतः कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून मंचर सुद्धा 16 तारखेपर्यंत बंद होतं. ते 23 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये शेती उपयुक्त औजारे बी बियाणे दुकाने पहिल्या 5 दिवसात तरी उघडणार नाहीत. पुण्याच्या ग्रामीण भागात पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली. मात्र पेरणी करूनही पीक न उगवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. सध्या शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र कोरोना महामारीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर पुन्हा उभे राहिले असून शेती संबंधित खते औषधाची दुकाने बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या