JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune: माजी खासदार संजय काकडेंना जामीन, गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात झाली होती अटक

Pune: माजी खासदार संजय काकडेंना जामीन, गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात झाली होती अटक

Sanjay Kakade: पुण्याचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर झाला आहे. सकाळी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 एप्रिल: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gajanan Marne) याने काढलेल्या रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे (Fomer MP Sanjay Kakade) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली होती. आता पुण्यातील शिवाजी नगर न्यायलयाने संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे. संजय काकडे यांना अटक केल्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायलयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? कुख्यात गुंड गजा मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी एक रॅली काढली होती. या रॅलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मोठ्या प्रमाणात आलिशान गाड्या या रॅलीत दिसून आल्या होत्या. माजी खासदार संजय काकडे यांनी या रॅलीसाठी गाड्या पुरवल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी माजी खासदार संजय काकडे यांना अटक केली होती. वाचा:  माजी खासदार संजय काकडेंना अटक, गजा मारणे प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई माजी खासदार असलेले संजय काकडे यांच्या काही गाड्या गजा मारणेच्या रॅलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने संजय काकडे यांना अटक केली. अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यावर पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली होती. यावेळी गजानन मारणे याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. आलिशान गाड्यांसह मोठ्या थाटामाटात त्याने रॅली काढली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या