JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई, बँकेच्या माजी अध्यक्षासह कुटुंबातील 4 जणांना घेतलं ताब्यात

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई, बँकेच्या माजी अध्यक्षासह कुटुंबातील 4 जणांना घेतलं ताब्यात

बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला आहे. ईडीच्या छापेमारी सुरू असतांना घरातच

जाहिरात

बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला आहे. ईडीच्या छापेमारी सुरू असतांना घरातच

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 29 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने एका बँकेच्या माजी अध्यक्षच्या घरावर मोठी कारवाई केली आहे. दि. सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष अमर मुलचांदणीसह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला आहे. ईडीच्या छापेमारी सुरू असतांना घरातच लपून बसलेल्या अमर मुलचंदाणी याने मोबाईल मधील बेहिशेबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले. त्याचबरोबर अमर मुलचंदाणीला लपवून ठेवण्यासाठी तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी मदत केली. ( सर्व्हे बनवणारी कंपनी महाविकास आघाडीने तयार केली’, रवी राणांचा नवीन शोध  ) या प्रकरणी ED च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशीरा मुलचंदाणीची पत्नी आणि 3 भावांसह एका कामगाराला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या