JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात डॉक्टरांची भरती होणार, आज लागणार 1283 जागांसाठी मेरिट लिस्ट

पुण्यात डॉक्टरांची भरती होणार, आज लागणार 1283 जागांसाठी मेरिट लिस्ट

शहरातील तब्बल 40 हजार नागरिकांची तपासणी आणि उपचार या काळात करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थकले आहेत.

जाहिरात

Pune: Medical staff pastes a notice on prevention against coronavirus, at the isolation ward of Naidu Hospital, in Pune, Wednesday, March 4, 2020. (PTI Photo)(PTI04-03-2020_000167B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 29 मे: महापालिकेतील रखडलेल्या डॉक्टर भरतीला  वेग आला असून कायम स्वरूपी भरण्यात येणाऱ्या पदांची ‘मेरिट लिस्ट’ जाहीर झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीलाही वेग येणार आहे. महापालिके एकूण 1283 पदे भरणार आहे. त्यात 1105 तात्पुरती पदे आहेत. तर 178 ही कायम स्वरुपाची पदे आहेत. निवडलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट शुक्रवारी (29 मे) रोजी लागणार आहे. करोनाबाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका; तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफने गेले 75 दिवस कुठलीही सुट्टी न घेता स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. शहरातील तब्बल 40 हजार नागरिकांची तपासणी आणि उपचार या काळात करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यांना काही काळ विश्रांतीची गरज आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे महापालिकेतील भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे महापालिकेतील डॉक्टरांना विश्रांती मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. अजित पवारांनी तात्काळ परवानगी देऊनही रखडलेली भरती वेगाने व्हावी म्हणून अखेर महापालिका आयुक्त गायकवाड यांनीही भरतीसाठीची ‘मेरिट लिस्ट’ तत्काळ‌ जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर अखेर ही यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे . आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown या क्षेत्रांना मिळू शकते सुट   भरतीचे सर्वाधिकार हे मुख्यसभेला असून ही सभा पुढील दोन ते तीन महिने होऊ शकणार नाही. या भरतीमध्ये राज्यभरातील ११०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ते लॉकडाउनमुळे पोहोचू शकले नसून त्यांनी लॉकडाउन संपल्यानंतर आपली कागदपत्रे सादर करू, अशी विनंती केली होती. तरीही शक्य तितक्या उमेदवारांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार ‘मेरिट लिस्ट’ तयार करण्यात आली असून ती जाहीर करण्यात येणार आहे. देशातील 6 मेगासिटींचे कोरोनाने केले हाल; एकट्या महाराष्ट्रातील 3 शहरांची अवस्था तत्काळ आवश्यकता असलेली ही पदांची मेरिट लिस्ट असणार असून त्यावर दोन दिवसांत हरकती सूचना मागविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादीत नावे असणाऱ्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तत्काळ कामावर घेण्यात येणार असून त्यानुसार महापालिकेची सध्याची अडचण दूर होईल अशी आशा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या