पुण्यात आत्तापर्यंत 2468 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे, 10 सप्टेंबर : महाराष्ट्रात coronavirus चं थैमान सुरू आहे. गुरुवारी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येनं नवा विक्रम केला. एकट्या पुणे शहरात 2969 नवे रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड परिसरात 1168 नवे रुग्ण सापडले. त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात रुग्णवाढीने कहर केला आहे. राज्यात 10 सप्टेंबरच्या सरकारी आकडेवारीनुसार 23,446 नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत. कोरोना साथीने कळस गाठलाय (peak) हेही स्पष्ट होत नाही. कारण नवी रुग्णसंख्या कमी व्हायचं नाव घेत नाही. बरे होणारे रुग्ण आणि नव्याने दाखल होणारे रुग्ण यातलं अंतर वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 23,446 नवे रूग्ण आढळलेत. तर दिवसभरात 14,253 रूग्ण बरे झाले आहेत. 448 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतच दिवसभरातली ही सर्वात जास्त संख्या आहे. राज्यातल्या रूग्णाची एकूण संख्या ही 9,90,795 एवढी झाली आहे. देशातले सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात राज्यातच नाही तर देशात सर्वाधिक रुग्णवाढ पुण्यात होते आहे. उपचाराधीन रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. राज्यात सध्या 2,61,432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यातले सर्वाधिक 69456 फक्त पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 69456 ठाणे 28460 मुंबई 26629 नागपूर 19294 नाशिक 10244 कोल्हापूर 9506 सांगली 8716 जळगाव 8280 सातारा 8064