JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, 1 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, 1 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नाला गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिली.

जाहिरात

ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नाला गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 19 डिसेंबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी बसला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. या अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 प्रवासी अत्यवस्थ तर एक गंभीर जखमी आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. (भाजप नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते झाले बेभान, पोलिसांनी केला लाठीचार्ज तर स्टेशनवरच काढला मोर्चा) ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नाला गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेसवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खंडाळा,रायगड,महामार्ग पोलीस यांच्या अथक प्रयत्नाने एक्स्प्रेस वेवरील महामार्ग खुला करण्याचा प्रयत्न करच आहे. वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. मुंबई लेन वरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मदतीसाठी आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. (नदीपात्रात मोटार ढकलत असताना विजेचा धक्का बसला, बापलेकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा आणि जनजागृती अभियानांतर्गत ऑनलाइन चाचणी घेतली जातेय याद्वारे प्रवासी आणि वाहन चालकांना मार्गदर्शन केलं जात असून नियमांचे पालन, कसे करायचे ते टेस्टद्वारे सांगितलं जात आहे तसेच ही चाचणी पास केलेल्या वाहनचालक आणि प्रवाश्यांना प्रमाण पत्र देखील दिलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या