JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'अजित पवार हे कार्यक्षम मंत्री', पलटवार केल्यानंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर?

'अजित पवार हे कार्यक्षम मंत्री', पलटवार केल्यानंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर?

अजित पवार यांनी पलटवार केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 एप्रिल : राज्यात कोरोनामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली असताना राजकीय पाराही चढला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच अजित पवार यांनी पलटवार केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. ‘अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत. सकाळी 7 वाजेपासून ते हजर असतात. अनेक मंत्र्यांचे फोन 11 वाजेपर्यंत बंद असतात. लोकशाहीचे हे सौंदर्य आहे की कुणी काही बोलू शकतं. त्या दिवशी अजित पवार यांचा फोन 24 तास बंद होता. अजित पवार यांनी एकतर पुण्यातून राज्य चालवावे किंवा पुण्यासाठी दुसरा पालकमंत्री नेमावा,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार ‘आऊट ऑफ नेटवर्क’ आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या आरोपाला सणसणीत प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवला. हेही वाचा - ‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’, आरोपांना उत्तर देताना अजित पवारांचा गौप्यस्फोट ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, एकीकडे राज्यातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याची स्थिती आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद रंगत असल्याने सर्वसामान्यांकडून तीव्र संताप नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर तरी राजकीय नेत्यांनी मतभेद दूर ठेवत राज्याला कोरोनाच्या ऐतिहासिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या