JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'सही रे सही', 5 लाख मराठी भाषिकांना स्वाक्षरी शिकवणारे शिक्षक, Video

'सही रे सही', 5 लाख मराठी भाषिकांना स्वाक्षरी शिकवणारे शिक्षक, Video

मराठी भाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कला शिक्षक गोपाळ वाकोडे यांनी एक वसा हाती घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 फेब्रुवारी : मराठी भाषेचे पांग फेडण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग असतात. बुलढाणा जिल्ह्यातील गोपाळ वाकोडे यांनी देखील आपल्या मराठी भाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका वेगळा मार्ग अवलंबला आहे. गोपाळ वाकोडे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करण्याची मोहीम हाती घेतलेली असून ते सर्वांना मराठीत स्वाक्षरी कशी करायची याचं प्रशिक्षण देतात. आत्तापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त जणांना त्यांनी या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं आहे. कधी झाली सुरुवात? गोपाळ वाकोडे हे कला शिक्षक आहेत त्यांनी 2004 पासून मराठी मध्ये स्वाक्षरी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये ते विविध नागरिकांना त्यांची मराठी मधील सही कशाप्रकारे करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवतात. प्रत्येकाला ते अशा चार सह्या मराठीमध्ये करून दाखवतात. याबाबत गोपाळ यांनी सांगितले की, ‘मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ही मोहीम मी हाती घेतली आहे. साधारण शंभरापैकी फक्त तीन ते चार लोकच मराठीमध्ये सही करतात. हीच गोष्ट बदलण्यासाठी मी ही मोहीम हाती घेतली आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवून मराठीमध्ये सही केली पाहिजे. सही त्यांना आवडावी अशा पद्धतीने मी लिहितो. अतिशय लफ्फेदार सुबक सुंदर अशी सही प्रत्येकाला मोहवून टाकते. यामुळे लोक मराठीमध्ये सही करण्याकडे नक्कीच वळतील अशी मला आशा आहे.’ स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं… पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video गोपाळ यांच्याकडे सही करायला आलेले ऋषिकेशने सांगितलं की, मला गोपाळ यांची कॅलिग्राफी खूपच आवडली. अशी लफ्फेदार पद्धतीने त्यांनी ह्या सह्या केल्या असून अशा पद्धतीने करण्याचा मी देखील प्रयत्न करेन.’ संपर्क क्रमांक  गोपाळ वाकोडे 9881190601

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या