NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

सध्याच्या काळात प्रत्येकाचे बँक अकाउंट आहे. तुमचं बँक अकाउंट असेल तर डेबिट कार्ड नक्कीच असेल. डेबिट कार्ड वापरताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. एकही चूक केली तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. याविषयीच सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

15

तुमचे बँक खाते असेल तर तुमच्यासोबत डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड असणे आवश्यक आहे. डेबिट कार्डच्या मागील बाजूस तीन अंकी CVV क्रमांक लिहिलेला असतो. आरबीआयचे म्हणणे आहे की डेबिट कार्ड मिळातच, यूझर्सने प्रथम त्यांचा CVV क्रमांक लक्षात ठेवावा किंवा तो सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवावा. जो इतर कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही.

25

आरबीआयकडून सांगितलं जातं की, CVV क्रमांक कार्डमधून मिटवला पाहिजे. असे केल्याने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. पण आरबीआयच्या इशाऱ्यानंतरही अनेकदा लोक याची दखल घेत नाहीत. अशा परिस्थितीत फसवणूक होण्याची शक्यता वाढते. हा 3 अंकी क्रमांक तुमचे खाते कसे रिकामे करू शकतो ते आपण जाणून घेऊया.उन्हाळ्यात AC मुळे जास्त वीजबिल येतंय? या 5 ट्रिक येतील कामी

35

CVV म्हणजे काय ते जाणून घ्या : CVV चा फूल फॉर्म म्हणजे Card Verification Value आहे. हा 3 अंकी क्रमांक आहे जो डेबिट कार्डच्या उलट बाजूस मॅग्नेटिक स्ट्रिपजवळ आढळतो. जेव्हा तुम्ही कार्डद्वारे पेमेंट करता तेव्हा तुम्हाला CVV नंबर टाकावा लागतो. या क्रमांकाशिवाय पेमेंट कन्फर्म होत नाही. म्हणूनच हा नंबर कार्डमधून डिलीट करून गोपनीय ठेवण्याचा सल्ला आरबीआयकडून दिला जातो. आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर

45

CVV मध्ये दोन भाग असतात: तुम्हाला एटीएम कार्डवर तीन अंकी सीव्हीव्ही दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यात दोन भाग असतात. पहिला भाग काळ्या रंगाच्या मॅग्नेटिक स्ट्रिपमध्ये लपलेला असतो. जो केवळ मॅग्नेटिक रीडर मशीनमध्ये स्वाइप केल्यानंतरच वाचता येतो. तर दुसरा भाग तुम्हाला संख्यांच्या स्वरूपात दिसतो.

55

CVV लपवणे का आवश्यक आहे : CVV हा OTP प्रमाणेच सिक्योरिटी लेयर आहे. जो तुमचे पेमेंट सुरक्षित ठेवण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करता तेव्हा तुम्हाला कार्डचे डिटेल्स टाकावे लागतात. कार्डचे डिटेल्सही तिथे सेव्ह केले जातात. पण CVV नंबर सेव्ह होत नाही. जर तुम्ही कार्डमधून हा CVV नंबर मिटवला, तर तुमचे कार्ड चुकीच्या हातात पोहोचले तरी ती व्यक्ती CVV शिवाय व्यवहार करू शकणार नाही. पण जर तुम्ही ते कार्डमधून काढून टाकले नाही, तर फसवणूक करणाऱ्याला तुमच्या सीव्हीव्हीची माहिती मिळते. अशा स्थितीत तुमचे खातेही रिकामे होऊ शकते. CVV हा तुमचा ATM पिन नाही. तुम्ही एटीएममध्ये पिन वापरून व्यवहार करू शकता, परंतु ऑनलाइन पेमेंटच्या वेळी सीव्हीव्ही वापरला जातो. मोदी सरकारकडून गुडन्यूज! या लोकप्रिय स्कीमची मुदत वाढवली

  • FIRST PUBLISHED :