जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मोदी सरकारकडून गुडन्यूज! या लोकप्रिय स्कीमची मुदत वाढवली

मोदी सरकारकडून गुडन्यूज! या लोकप्रिय स्कीमची मुदत वाढवली

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंत घेता येणार आहे. या योजनेचा लाभ तुम्ही LIC वरून ऑनलाइन आणि ऑफलाइन घेऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 1 मार्च: ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील यामध्ये येत असाल किंवा तुमचे आई-वडील किंवा आजी अजोबा या योजनेचा लाभ घेऊ शकत असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडे प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे सदस्यत्व घेण्याची मुदत मोदी सरकारकडून वाढवण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ 31 मार्चपर्यंत घेऊ शकतात. केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळानेद्वारे ही योजना ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन बनवली आहे. ही एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा गुंतवणुकीवर 7.4 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो. 31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही पेन्शनच्या या दराचा लाभ घेऊ शकता.

    ही योजना नेमकी काय?

    ज्या लोकांना PMVVY योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे किमान वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असायला हवे. तसेच प्रवेशासाठी कमाल वयाची मर्यादा नाही. पॉलिसीची मुदत 10 वर्षे आहे. यामध्ये तुम्ही दरमहा, तिमाही, सहा महिने आणि वार्षिक गुंतवणूक करू शकता. तसेच, किमान पेन्शन अनुक्रमे 1,000 मासिक, 3,000 त्रैमासिक, 6,000 सहामाही आणि 12,000 रुपये वार्षिक म्हणून घेतली जाऊ शकते. मिळू शकणारी कमाल पेन्शन अनुक्रमे रु. 10,000 प्रति महिना, रु. 30,000 रु. तिमाही, रु. 60,000 सहामाही आणि रु. 1,20,000 वार्षिक आहे.

    HDFC ने सुरु केला लाइफ इन्कम इन्शुरन्स प्लॅन, रिटर्नसोबत मिळेल टॅक्स बेनिफट

    कधी सुरु झाली होती ही योजना

    केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदना ही पेन्शन योजना 4 मे 2017 रोजी सुरू केली होती. परंतु आता तुम्हाला 31 मार्च 2023 पर्यंत त्याचे लाभ मिळू शकतात. 2018-2019 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत कमाल मर्यादा 7.50 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये केली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    LIC कडून दिला जातोय लाभ

    तुम्ही हा प्लान LIC कडून घेऊ शकता. ही योजना LIC कडून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे व्याजदरात घट होत असताना ज्येष्ठ नागरिकांना नियमित पेन्शन देणे हा आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात