NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. यावेळी एका नवीन घटनेत मुंबईत एका महिलेची 81 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. महिला सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.

16

सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. यावेळी एका नवीन घटनेत मुंबईत एका महिलेची 81 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर येथील 47 वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली आहे. महिलेचा सेट-टॉप-बॉक्स रिचार्ज तिला काही प्रॉब्लम येत होते. Airtel यूझर्ससाठी खुशखबर! आता मिळेल 'अनलिमिटेड 5G डाटा', लागेल एवढा चार्ज

26

तिने 5 मार्च रोजी 931 रुपये ऑनलाइन भरले होते आणि डीटीएच सेवा पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होती. मात्र, रिचार्ज करूनही त्याला कन्फर्मेशन मेसेज आला नाही. तसेच त्यांचा सेट-टॉप-बॉक्स बॅलन्स अपडेट केला गेला नाही. Tax Saving चा काही प्लान केलाय? 31 मार्च लास्ट डेट, हे 5 पर्याय आहेत बेस्ट

36

ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधला. त्यानंतर महिलेला एक हेल्पलाइन क्रमांक मिळाला. यावर त्यांनी संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितले की, तो कंपनीचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहे आणि तो त्यांची समस्या सोडवेल. मात्र तो सायबर गुन्हेगार होता. अबब! नवरीची साडी 17 कोटी तर दागिने 90 कोटींचे, 'या' शाही लग्नाचा खर्च पाहून तुम्हालाही येईल चक्कर

46

यावर महिलेने या गुन्हेगाराला खराखुरा एक्झिक्युटिव्ह समजून आपली समस्या सांगितली. त्यानंतर ठगाने महिलेचा विश्वास जिंकला आणि तिला तिच्या फोनवर रिमोट ऍक्सेस अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने होकार देत अॅप इन्स्टॉल केलं. हे केल्यानंतर त्याला ओटीपी मिळू लागले आणि त्याला ट्रांझेक्शनचे मॅसेजही येऊ लागले. अशाप्रकारे महिलेच्या खात्यातून 81 हजार रुपये लंपास झाले.

56

आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी IPC आणि इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टसंबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 'या' वेबसाइट्सवर चक्क रेंटने घेता येतो AC! ना पैशांच टेन्शन ना सर्व्हिसिंगची कटकट

66

ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधल्यानंतर फसवणूक होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, सावधगिरी बाळगा आणि अधिकृत ठिकाणांहूनच नंबर काढा आणि कोणालाही कोणत्याही प्रकारचा अॅक्सेस देऊ नका.

  • FIRST PUBLISHED :