NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध

तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध

कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला पिन किंवा ओटीपीची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्ही POS मशिनजवळ गेले नाही, पण पीओएस मशीन तुमच्या जवळ आणून कार्डच्या संपर्कात आणले, तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.

15

चिप इनेबल्ड डेबिट कार्ड कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डद्वारे वेगाने अपग्रेड केले गेले आहेत. जर तुम्ही गेल्या एक-दोन वर्षांत नवीन कार्ड घेतले असेल, तर तुम्ही वाय-फाय इनेबल्ड कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरत असण्याची शक्यता आहे. तुमचे कार्ड वाय-फाय इनेबल्ड आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या कार्डवरील वाय-फायचे चिन्ह तपासू शकता. असे असेल तर ही सुविधा तुमच्या कार्डमध्ये उपलब्ध आहे. या कार्डद्वारे, तुम्ही पॉइंट सेलवर तुमचा पिन न टाकता पेमेंट करू शकता, म्हणजे कोणत्याही दुकानात, रेस्टॉरंटमध्ये कार्डद्वारे पिन न टाकता पेमेंट करता येईल. मोबाईल चोरी झाला? कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स

25

वाय-फाय इनेबल्ड याचा अर्थ हे कार्ड वाय-फाय वर चालतात असं नाही. ते NFC ((Near Field Communication) आणि RFID (Radio Frequency Identification वर काम करतात. त्यात एक चिप असते, जी अतिशय पातळ धातूच्या अँटेनाला जोडलेली असते. घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! 'या' सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

35

कशी होऊ शकते फसवणूक : कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला पिन किंवा ओटीपीची गरज नाही. तुम्हाला फक्त POS मशीनने कार्डला स्पर्श करावा लागेल. या कार्ड्सची रेंज 4 सेमी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पीओएस मशिनजवळ गेले नाही, पण पीओएस मशीन तुमच्या जवळ आणून कार्डच्या संपर्कात आणले, तर तुमच्या नकळत कार्डमधून पैसे जातील. असे अनेक रिपोर्ट्स आले होते, ज्यामध्ये ठग लोकांच्या जवळ POS मशीन घेऊन त्यांच्या कार्डमधून पैसे चोरतात. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी तुमच्या पाकिटात ठेवलेले कार्ड पीओएस मशीनच्या जाळ्यात अडकू शकते. Paytm वरुन क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला भरता येतं का? ही आहे सोपी प्रोसेस

45

कॉन्टॅक्टलेस कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे? : जर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये अशी कार्डे ठेवली तर त्यामध्ये धातूचा अडथळा असावा. एकतर तुम्ही हे कार्ड अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा तुम्ही मेटल वॉलेट वापरू शकता. तुम्हाला RFID ब्लॉकिंग वॉलेट देखील मिळतील, जे तुमचे कार्ड सुरक्षित ठेवतील.

55

तुमच्या कार्डने पेमेंट करताना, नेहमी तुमच्यासमोरच प्रोसेस करण्यास सांगा. रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये पेमेंट प्रक्रिया स्वतः करा. व्यापार्‍याला कार्ड देण्याऐवजी, त्याला स्वतः स्पर्श करा आणि पेमेंट डीटेल चेक करा. पैसे कापल्यानंतर तुमचे बिल आणि मेसेज देखील चेक करा. पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी

  • FIRST PUBLISHED :