मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोबाईल चोरी झाला? कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स

मोबाईल चोरी झाला? कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स

यूपीआय पेमेंट करणाऱ्यांचा मोबाईल चोरी झाल्यास काय?

यूपीआय पेमेंट करणाऱ्यांचा मोबाईल चोरी झाल्यास काय?

सध्याच्या काळात आपल्या मोबाईलमधूनच सर्व पैशांचे व्यवहार होतात. यामुळे चुकून मोबाईल हरवला तर सर्वात जास्त टेंशन यूपीआयचा चुकीचा वापर होण्याविषयी असतं. आज आपण यासाठीच काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च:  आजच्या काळात मोबाईल फोन खूप महत्वाचा झालाय. याशिवाय आता दैनंदिन कामं देखील होत नाही. पैशांचे सर्व व्यवहार देखील आता एका झटक्यात मोबाईलवर होतात. यामध्ये UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. UPI द्वारे, घरी बसून, लोक फक्त मोबाईल नंबरद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. नुकतेच UPI आंतरराष्ट्रीय झाला आहे. भारताचा UPI आणि सिंगापूरचा Penau च्या लिंकनंतर आता लोक भारतातून सिंगापूरला फक्त मोबाईल नंबरद्वारे पैशांचा व्यवहार करू शकतात. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवला तर त्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकतं. कारण अशा वेळी यूपीआयचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयीच काही खास टिप्स आपण पाहणार आहोत.

ऑनलाइन Income Tax कसा भरावा? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

मोबाईल चोरीला गेल्यास बँक खात्यातून upi पेमेंट थांबवा

डिजिटल पेमेंटचा लाभ घेण्यासोबतच त्यासंबंधीची खबरदारी घेणे ही देखील यूझर्सची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जर तुमचा मोबाईल कुठेतरी हरवला असेल तर बँक खात्यातून UPI ​​पेमेंट थांबवणे खूप गरजेचे आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचं अकाउंट एका झटक्यात रिकामं होऊ शकतं. बँक खात्यातून UPI डिअ‍ॅक्टिव्हेट कसं करावं याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया...

आपल्या बँक अकाउंटवरुन यूपीआय कसं करावं डीअ‍ॅक्टिव्हेट

  • जर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरुन UPI डिअ‍ॅक्टिव्हेट करायचा असेल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचंय की तुम्ही तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नये.
  • UPI पेमेंट निष्क्रिय करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करा आणि तुमचं सिम ब्लॉक करा. यामुळे मोबाईल बँकिंगशी संबंधित कोणताही मेसेज किंवा ओटीपी चुकीच्या हातात पडणार नाही.
  • यानंतर, तुमच्या बँक खात्यातून UPI ​​ब्लॉक करण्यासाठी, तुमच्या UPI अॅपला जसे पेटीएम, गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे इत्यादींवर कॉल करा आणि UPI सेवा तात्काळ बंद करण्याची रिक्वेस्ट करा.
  • यानंतर, तुमच्या मोबाईलच्या चोरीसाठी ताबडतोब एफआयआर नोंदवा. याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचा गैरवापर थांबवू शकाल.
  • यासोबतच बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगही तात्काळ बंद करा.

First published:
top videos

    Tags: Smart phone, Upi