NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / काय सांगता! नदीच्या काठावरं मिळतंय सोनं, शोधण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी

काय सांगता! नदीच्या काठावरं मिळतंय सोनं, शोधण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी

पश्चिम बंगालमधून एक आगळे वेगळे प्रकरण समोर येत आहे. नदीच्या काठावर सोनं सापडत असल्याची बातमी सध्या बीरभूम गावात पसरली आहे. यामुळे लोकांनी या ठिकाणी गर्दी करण्यात सुरुवात केलीये.

15

नदीच्या किंनाऱ्यावर सोनं मिळतंय असं कळलं तर काय होईल? त्या नदीच्या काठावर लोकांची एकच गर्दी होईल. असंच एक प्रकरण पश्चिम बंगालमधून समोर येत आहे. बीरभूम नदीच्या किनाऱ्यावर सोनं मिळत असल्याचं सांगण्यात येतंय. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरतील आणि नदीच्या काठावर गावकऱ्यांनी तुंबळ गर्दी केली. सोन्याच्या शोधात कुणी फावडं घेऊन आलंय तर कुणी आपल्या हातांनीच नदीच्या काठावर खड्डे खोदत आहे. बीरभूमच्या परकंडी गावातील ही घटना आहे. अबब! नवरीची साडी 17 कोटी तर दागिने 90 कोटींचे, 'या' शाही लग्नाचा खर्च पाहून तुम्हालाही येईल चक्कर

25

नदीच्या वाळूत सोनं मिळतंय या बातमीवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र येथील स्थानिक असा दावा करत आहेत. बीरभूमच्या मुरई पोलीस स्टेशनच्या परकांडी गावाजवळ बन्सलोई नदी वाहते. या नदीत वर्षभर पाणी नसते. ही नदी पावसाळ्यात भरभरुन वाहते. मात्र सध्या भर उन्हाळ्यात या नदीच्या काठावर माणसांचा पूर आलाय. ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

35

नदीच्या वाळूत सापडले सोनं : ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवसांपूर्वी झारखंडमधील एका रहिवाशाला पहिल्यांदाच त्या नदीच्या काठी सोन्याचे दागिने सापडले होते. अनेक सोन्याचे दागिने पाहणारे आणि मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. झारखंडजवळील बीरभूमच्या गावातील लोक नदीच्या काठावर जमले आणि सोने गोळा करण्यासाठी त्यांनी एकच गर्दी केली. सोन्याच्या नाण्यांसारख्या अनेक गोलाकार वस्तू येथे सापडल्याचं सांगण्यात येतं. Tax Saving चा काही प्लान केलाय? 31 मार्च लास्ट डेट, हे 5 पर्याय आहेत बेस्ट

45

दोन दिवसांपूर्वी येथील नदीच्या वाळूत सोने सापडल्याचे स्थानिक युवक सुजन शेख यांनी सांगितले. त्यानंतर ही बातमी पसरताच विविध ठिकाणांहून लोक येऊन सोनं शोधू लागले. अनेकांना खूप काही मिळाले तरीही त्याला अजून काही मिळाले नाही. वेगवेगळ्या लोकांकडून मिळालेल्या बातमीनुसार हे लोक आता सोन्याच्या शोधात नदीच्या काठावर आले आहेत. मात्र हे सोन्याचे दागिने कुठून आले याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. असे मानले जाते की 'महेशपूर राजबारी', त्यापैकी बहुतेक नंतर सुवर्णरेखा नदीच्या पाण्यात बुडले होते. त्या राजबारीतून हे सोने सुवर्णरेखा नदीमार्गे बनसलोई नदीत येऊ शकते. हा अंदाज लावला जातोय.

55

नदीच्या काठावर सोनं मिळतंय ही बातमी पसरताच एकच धुमाकूळ उडाला आहे. मुरारी येथील ब्लॉक 1 चे बीडीओ जगत चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून नदीच्या काठावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :