केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी पगारवाढीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. असं असताना अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची घोषणा येत्या 10 दिवसांत केली जाऊ शकते. सध्या कागदोपत्री काम सुरू आहे.
अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर इंडिया डॉट कॉम या वेबसाइटला ही माहिती दिली की, केंद्र सरकारचे कर्मचारी यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीची अपेक्षा करू शकतात. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या महागाई सवलतीत 4% वाढ होऊ शकते. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जर महागाई भत्ता वाढवला तर तो 1 जानेवारी 2023 पासूनच लागू होईल. यापूर्वी, मीडिया रिपोर्ट्सने सुचवले होते की, केंद्र सरकार 8 मार्च रोजी डीए वाढीची घोषणा करू शकते. मात्र, अद्याप अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. डीए आणि डीआर वाढीमुळे देशातील 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ITR भरणाऱ्यांनो चुकूनही विसरु नका 'ही' तारीख! अन्यथा भोगावे लागेल नुकसान
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ :DA आणि DR वाढीव्यतिरिक्त, केंद्राने या महिन्यात फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील सुधारणा करणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्राकडून आठवडाभरात घोषणा झाल्यावरच हे सर्व स्पष्ट होईल. Credit Score चांगलाय, तरी लोन मिळत नाही? असू शकतात ही कारणं
पगार किती वाढणार? : फिटमेंट फॅक्टर वाढल्यास, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कॉमन फिटमेंट फॅक्टर आता 2.57 टक्के आहे. फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के करण्याची मागणी सरकारी कर्मचारी केंद्राकडे करत आहेत. बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून
18 महिन्यांच्या डीए थकबाकीची मागणी : डीए आणि फिटमेंट फॅक्टर वाढीशिवाय, केंद्र सरकारचे कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए थकबाकीची मागणी करत आहेत. मात्र याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हे माहित असायला हवे की, महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वर्षातून दोनदा सुधारित केली जाते, जी 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू होते. केंद्राने सप्टेंबर 2022 मध्ये महागाई भत्त्यात शेवटची वाढ केली होती. ज्याचा फायदा सुमारे 48 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना झाला होता. केंद्राने डीए 4 टक्क्यांनी वाढवून 38 टक्के केला होता. यापूर्वी केंद्राने सातव्या वेतन आयोगांतर्गत मार्चमध्ये डीए 3 टक्क्यांनी वाढवून 34 टक्के केला होता.