मुंबई, 8 मार्च: कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही सहज लोन डील मिळवू शकता. दुसरीकडे, जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर तुम्हाला कर्ज मिळवण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र अनेक वेळा असे घडते की, चांगला क्रेडिट स्कोर असूनही कर्ज मिळत नाही. यामागे काही कारणं आहेत. चांगला क्रेडिट स्कोअर असूनही ग्राहकाला कर्ज मिळू न शकण्याची कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊया. कर्जासाठी अर्जदाराचे वय खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कर्ज मंजूर होत नाही. निवृत्तीचे वय जवळ आलेले लोक सहसा गृहकर्जासाठी किंवा 15 ते 25 वर्षांच्या मुदतीच्या कर्जासाठी पात्र मानले जात नाहीत. कर्ज देणाऱ्यांना असे वाटते की कर्जदार निवृत्तीनंतर EMI भरू शकणार नाही. अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियम परतफेड क्षमता कर्ज अर्जामध्ये अर्जदाराच्या उत्पन्नाला खूप महत्त्व असते. जेव्हा जेव्हा कर्ज देणाऱ्याला कर्जाचा अर्ज येतो तेव्हा तो अर्जदाराच्या परतफेड क्षमतेचे मूल्यांकन करतो. हे मूल्यमापन मासिक उत्पन्न, अवलंबितांची संख्या आणि उत्पन्नाच्या स्त्रोताच्या स्थिरतेच्या आधारावर केले जाते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल परंतु मासिक उत्पन्न कमी असेल तर तुमचा कर्ज अर्ज फेटाळण्याची शक्यता वाढते. बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून ईएमआय ते उत्पन्नाचे प्रमाण लोन डील मंजूर करताना EMI-उत्पन्न गुणोत्तर देखील कर्ज देणारे पाहतात. कर्जदाराची एकूण वर्तमान EMI परतफेड रक्कम त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, त्याच्या नवीन कर्ज अर्जाला मंजुरी मिळण्याची शक्यता वाढते. तुमचा जॉब बहुतेक बँका आणि वित्तीय संस्थांना कर्ज अर्जदारासाठी किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक असतो. यामुळे डिफॉल्टचा धोका कमी होतो. दुसरीकडे, जर तुम्ही वारंवार नोकर्या बदलत असाल तर ते अस्थिर करिअरचे लक्षण आहे. अशा लोकांची विश्वासार्हता कमी होते आणि तुमची लोन डील रद्द होण्याची शक्यता वाढते.