आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्पन्नासाठी टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नवीन असेसमेंट ईयर 2023-24 मध्ये, 1 एप्रिल 2023 पासून आयकर रिटर्न भरणे सुरू होईल. यासोबतच प्रत्येकाने आयकर रिटर्न भरण्याच्या शेवटची तारीखही लक्षात ठेवावी. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. या तारखेनंतर, आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलणार नसल्याची देखील चर्चा आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत 31 जुलैच्या अगोदर आयटीआर दाखल करणं गरजेचं आहे. सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय 'ही' चूक, होईल मोठे नुकसान
ITR फायलिंग : गेल्या काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की, सरकारने विविध कारणांमुळे आयटीआर फाइलिंगसाठी देय तारखा वाढवल्या आहेत. मात्र, यंदा शेवटच्या तारखेला मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा चर्चा आहेत. कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी नवीन ITR फॉर्म एक महिना अगोदर अधिसूचित केला आहे. नवीन ITR फॉर्म 10 फेब्रुवारी रोजी CBDT द्वारे अधिसूचित केले गेले आणि ते आयकर वेबसाइटवर उपलब्ध आहेत. Credit Score चांगलाय, तरी लोन मिळत नाही? असू शकतात ही कारणं
आयकर रिटर्न : 1 एप्रिलपासून असेसमेंट ईयर 2023-24 सुरू होत आहे. यामुळे टॅक्सपेयर्स 1 एप्रिलपासून 2023-24 या आर्थिक वर्षात केलेल्या उत्पन्नाचे विवरणपत्र दाखल करु शकतात. रिटर्न भरण्याची सुविधा 31 जुलैपर्यंत उपलब्ध असेल. जर तुम्ही या तारखेपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर विलंब शुल्कासह ITR दाखल करण्याचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न न भरणाऱ्यांना आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागेल. Motor Insurance पॉलिसी क्लेम वारंवार रिजेक्ट होतंय? फॉलो करा या स्टेप्स