NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! 'या' सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! 'या' सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने रविवारी गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 8.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर आणले आहेत.

15

बँकांच्या वाढत्या गृहकर्ज दरामुळे तुम्ही हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी कर्जाचे दर वाढवले ​​आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. Axis Bank च्या ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदरांममध्ये केली वाढ

25

बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील व्याजदर सध्याच्या 8.6 टक्क्यांवरून 8.4टक्के केला आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन दर 13 मार्च 2023 पासून लागू होतील. हे होम लोन 8.4 टक्के व्याजदरासह बँकिंग क्षेत्रातील सर्वात स्वस्त होम लोनपैकी एक आहे. घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय 'या' बँका

35

बँक ऑफ महाराष्ट्र डिफेंस पर्सनल्ससह पॅरामिलिट्री फोर्ससाठी एक स्पेशल इंटरेस्ट रेटही ऑफर करतेय. ज्याचा लाभ पगारदार व्यक्ती आणि पेंशनर्स घेऊ शकतात. अवघ्या 5 मिनिटात मिळेल होम लोन; एकदा प्रयत्न तर करून पाहा, ही आहे प्रक्रिया!

45

याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीसही माफ केली आहे. ही बँक आता गृहकर्ज, कार लोन आणि गोल्ड लोनवर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फीस आकारणार नाही.

55

गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानेही गृहकर्जाचा व्याजदर 0.40 टक्क्यांनी कमी करून 8.5 टक्के केला होता. बँकेने एमएसएमई कर्जावरील व्याजदरही कमी केले आहेत. बँक एमएसएमई कर्जावर 8.4 टक्के दराने व्याज आकारण्यास सुरुवात करेल. BOB ने एका निवेदनात म्हटले आहे की, व्याजदरातील दोन्ही बदल 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंतच प्रभावी होतील.

  • FIRST PUBLISHED :