रोज डे - व्हॅलेंटाईन वीक उद्या 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने सुरू होईल. रोज डेला जोडीदार एकमेकांना गुलाब देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे, त्यामुळे या फुलाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना आवडत्या व्यक्तीसमोर मांडू शकता.
प्रपोज डे - रोज डे नंतर प्रपोज डे येतो. त्याच्या नावाप्रमाणेच हा दिवस प्रपोज करण्याचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याच्यावर प्रेम आहे, त्याला प्रपोज डे ला प्रपोज करा, नाहीतर फार उशीर झालेला असेल. विवाहित असाल तरीही तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. त्यांच्यासाठी काही खास सरप्राईज प्लॅन करून हा दिवस साजरा करू शकता.
चॉकलेट डे - व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे आहे, जो 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोक त्यांच्या नात्यातील सर्व कटुता आणि आंबटपणा विसरून त्यांच्या क्रश, पार्टनर किंवा बेस्ट फ्रेंडसोबत चॉकलेट्स शेअर करून हा दिवस साजरा करतात.
टेडी डे - व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे टेडी डे. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला गोंडस टेडी बियर गिफ्ट करू शकता. टेडी मुलींना खूप आवडतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी हा गोंडस टेडी तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर तुमचा लाईफ पार्टनर टेन्शनमध्ये असेल तर त्यांच्यासाठी छोटा किंवा मोठा टेडी बेअर आणा, टेंशन दूर होईल.
प्रॉमिस डे - पाचवा दिवस प्रॉमिस डे आहे. या विशेष दिवशी BF-GF, पती-पत्नी आणि प्रेमळ जोडपे एकमेकांना वचन देतात की ते नेहमी आनंदात आणि दुःखात एकत्र असतील.
हग डे - हग डे हा व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस आहे. 12 फेब्रुवारीला लोक आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारुन आपल्याला भावनांना मोकळी वाट करुन देतात. जेव्हा शब्द आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, तेव्हा शारीरिक स्पर्शाची भाषा अफलातून काम करते.
किस डे - व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. प्रपोज डेच्या दिवशी ज्यांचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला जातो, ते आपल्या जोडीदाराला प्रेमाने किस करून या नात्यावर कायमचे शिक्कामोर्तब करतात. आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, कपाळावर, हातावर, गालावर प्रेमाने चुंबन घेणे ही सर्वोत्तम भावना आहे.
व्हॅलेंटाईन डे - प्रेमाच्या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारीला जगभरातील लोक व्हॅलेंटाईन डे उत्साहाने साजरा करतात. नवविवाहित जोडपे असोत किंवा नवीन प्रेमी युगल, त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो.