मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाइन डे, वाचा भन्नाट आयडिया

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाइन डे, वाचा भन्नाट आयडिया

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची खूप आठवण येते. मात्र अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही हा दिवस सर्वोत्तम बनवू शकता.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची खूप आठवण येते. मात्र अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही हा दिवस सर्वोत्तम बनवू शकता.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची खूप आठवण येते. मात्र अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असूनही हा दिवस सर्वोत्तम बनवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांना एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते. मात्र लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना इच्छा असूनही त्यांच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन डे काही खास पद्धतीने साजरा करून तुम्ही हा दिवस केवळ खास बनवू शकत नाही तर दूर राहून तुम्ही जोडीदारासोबतच आहात असे तुम्हा दोघांनाही वाटेल.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना खूप एकटे वाटते. यासोबतच या दिवशी लोक आपल्या पार्टनरला खूप मिस करतात. मात्र तुम्ही काही उत्कृष्ट टिप्स फॉलो करून आपण दूर राहून देखील आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या टिप्स.

DDLJ चे शाहरुख खान होऊ नका; एखादीला प्रपोज करताना या 5 गोष्टी लांबच ठेवा!

जोडीदारासोबत डेट प्लॅन करा

व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हर्च्युअल डेट प्लॅन करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर सजवून तुमच्या पार्टनरला व्हिडिओ कॉल करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हर्च्युअल कँडल लाईट डिनर करू शकता. यावेळी तुम्ही एकमेकांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देऊन हा दिवस खास आणि रोमँटिक बनवू शकता.

छानसे गिफ्ट द्या

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांची आवडती भेट देखील देऊ शकता. यावेळी तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करून किंवा एखाद्या मित्राला भेटवस्तू पाठवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर व्हॅलेंटाइन सरप्राईज देऊ शकता.

रोमँटिक मुव्ही पाहा

व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक रोमँटिक मुव्हीदेखील पाहू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत केवळ दर्जेदार वेळ घालवू शकत नाही, तर लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असूनही तुम्ही व्हॅलेंटाईन डे एका खास पद्धतीने साजरा करू शकाल.

व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या पार्टनरला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट!

जोडीदाराला रोमँटिक मॅसेज किंवा ग्रीटिंग पाठवा

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर रोमँटिक मॅसेज किंवा ग्रिटिंगदेखील पाठवू शकता. या मेसेजमध्ये तुम्ही तुमचे प्रेम उघडपणे व्यक्त करू शकता. तसेच तुमच्या जीवनात तुमच्या जोडीदाराचे महत्त्व सांगून तुम्ही त्यांचा दिवस सर्वोत्तम बनवू शकता. दुसरीकडे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पार्टनरला व्हॉईस नोट पाठवणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Lifestyle, Relationship, Valentine Day