भुवनेश्वर, 25 जानेवारी : प्रेमीयुगुलांसाठी 14 फेब्रवारी हा महत्त्वाचा मानला जातो. याच 14 फेब्रुवारीशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशातील एका महाविद्यालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत मुलींना बॉयफ्रेंड असणे बंधनकारक करणारी नोटीस जारी केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही नोटीस जारी केली नसून ती फेक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ईटीव्ही भारतने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विचित्र परिपत्रकात काय?
"व्हॅलेंटाईन डेपर्यंत सर्व विद्यार्थिनींना किमान एकतरी बॉयफ्रेंड असणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षेच्या कारणाच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंगल असलेल्या मुलींना कॉलेजच्या आवारात प्रवेश मिळणार नाही. तसेच मुलींना आपल्या बॉयफ्रेंडसोबत काढलेला लेटेस्ट फोटो दाखवावा लागणार आहे" असे विचित्र परिपत्रक काढल्यानंतर ओडिशातील एका महाविद्यालय चर्चेत आले आहे. स्वामी विवेकानंद मेमोरिअल (SVM) स्वायत्त महाविद्यालयाने सर्वांनाच चक्रावून सोडणारी नोटीस जारी केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झालेली नोटीस खोटी निघाली. नोटीसवर एसव्हीएम ऑटोनॉमस कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी असल्याचे दिसत असली तरी, आपण अशी कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या नोटीसबाबत कॉलेज प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कुमार पात्रा यांनी जगतसिंगपूर पोलीस ठाण्यात बनावट नोटीसबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पात्रा म्हणाले, "माझ्या नावाने जारी करण्यात आलेली नोटीस, जी कॉलेजमध्ये फिरत होती, ज्यामध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत सर्व मुलींना बॉयफ्रेंड असणे आवश्यक आहे, ती खोटी आहे. मी अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. काही बदमाशांनी हे केले आहे. नोटीसमध्ये माझे बनावट स्वाक्षरी आहे. शिवाय, त्यामध्ये कोणताही अधिकृत क्रमांक नमूद केलेला नाही, त्यामुळे ही नोटीस खोटी आणि बनावट असल्याचे सिद्ध होत आहे. या प्रकरणाची मी जगतसिंगपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे." याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Photo viral, Valentine day, Viral, Viral post