जळगाव, 31 जुलै : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात आधीच लॉकडाऊन आहे. या काळात गुन्ह्यांच्या अनेक भयानक घटना समोर आल्या. हत्येचा असाच एक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या रागात तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणाने हत्येनंतर रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलीस स्थानक गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपुर्वी लग्न झालं असताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद भांडण व्हायचं. म्हणून पत्नी कायम माहेरी रहायची. पण आपल्या बहिणीला वागवत नाही या गोष्टीचा राग आल्याने तरुणाने प्लॅन आखत मेव्हण्याला रस्त्यावरच गाठलं. त्याला ठार मारत रक्ताने माखलेला चाकू घेवून तो पोलीस स्टेशनला गेला. पुढच्या 8 दिवसांत कोरोना हरवण्यासाठी पुणे होणार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश नेरी (ता. जामनेर) इथे माहेरी असलेल्या विवाहितेचे तीन वर्षापुर्वी म्हणून 2017 मध्ये गावापासून सात किमी अंतरावरील चिंचखेडा बु. या गावातील भागवत मोतीराम पारधी याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवसच ती महिला सासरी राहिली. त्यानंतर काही दिवसातच ती माहेर आली. माहेरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठविले असता, पती- पत्नीमध्ये सातत्याने वाद होत रहायचे. यामुळे विवाहिता वारंवार माहेर येत असते. ही बाब तिचा भाऊ परमेश्वर प्रकाश पारधी याला खटकत होती. यामुळे त्याचे मेहुणे भागवत पारधी यांच्याबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. यामुळे अद्दल घडवायची हे मनाशी ठरवलं होतं. त्याने आपल्या मेहवण्याला लहासर गावाच्या फाट्यावर रस्त्यातच रोखलं आणि चाकून वार केलं. यात भागवत पारधी यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय सगळ्यात धक्कादायक म्हणजे, यानंतर रक्ताने भरलेला चाकून घेऊन स्वतःहुन पोलीस ठाण्यात आला आणि पोलिसांना म्हणाला ‘मी माझ्या मेव्हण्याचा खुन केला’ आरोपीच्या या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.