JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नाशिक कनेक्शन! योगी आदित्यनाथ धमकीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

नाशिक कनेक्शन! योगी आदित्यनाथ धमकीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 25 मे: उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. नाशिक शहकातील भद्रकाली भागातील एका 20 वर्षीय तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने ( ATS) अटक केलं आहे. योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्याला यूपी STFच्या ताब्यात दिलं आहे. मात्र अटक केलेल्या आरोपीला सोडून द्या, नाहीतर गंभीर परीणाम भोगावे लागतील, अशी धमकी देणाऱ्या दुसऱ्या आरोपीला नाशकातून अटक करण्यात आली. आरोपीनं यूपी पोलिसांच्या सोशल विभागाला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा.. मठाधिपती हत्याप्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक, धक्कादायक माहिती आली समोर पोलिसांनी शनिवारी मुंबईतल्या चुनाभट्टी इथल्या एका युवकाला अटक केली होती. त्याने कबुलीही दिली आहे. त्याला कोर्टात हजर करून उत्तर प्रदेश ATS च्या ताब्यात दिलं जाणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. कमरान अमीन खान (वय 25) असं आरोपीचं नाव आहे. ज्या नंबरवरून फोन आला त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याची माहिती घेत मुंबई पोलिसांना कळवलं. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याचा माग काढला आणि गुप्त माहिती गोळा केली. त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा मेसेज मिळाला होता. ‘मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे,’ अशी धमकी देत एका विशेष समुदायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शत्रू बनले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटलं होते. या प्रकरणी गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 505(1)b 506,आणि 507नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा… कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ सरकारने घेतला मोठा निर्णय 8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस या मोबाइल क्रमांकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती गोमती नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी एसटीएफकडे सोपवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या