जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने घेतला मोठा निर्णय

कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने घेतला मोठा निर्णय

Lucknow: An official uses thermal screening device on Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, in the wake of deadly coronavirus, prior to his press conference on completion of his three years in office at Lok Bhawan, in Lucknow, Wednesday, March 18, 2020. (PTI Photo/Nand Kumar)(PTI18-03-2020_000083B)

Lucknow: An official uses thermal screening device on Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, in the wake of deadly coronavirus, prior to his press conference on completion of his three years in office at Lok Bhawan, in Lucknow, Wednesday, March 18, 2020. (PTI Photo/Nand Kumar)(PTI18-03-2020_000083B)

नव्या आदेशानुसार, रुग्णांना अटींसह खासगी मोबाइल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनौ,25 मे: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ‘कोव्हिड-19’ अर्थात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. कोव्हिड-19 रुग्णालयांतील विलगीकरण कक्षातील मोबाइल फोनच्या वापरावरील बंदीचा आदेश अखेर सरकारने मागे घेतला आहे. यामुळे आता दाखल झालेले रुग्ण वॉर्डमध्ये मोबाइल वापरू शकणार आहेत. हेही वाचा.. मठाधिपती हत्याप्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक, धक्कादायक माहिती आली समोर तत्पूर्वी, मोबाइल फोनमुळे कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याने विलगीकरण कक्षामध्ये मोबाइल फोन नेता येणार नसल्याचे सांगून, उत्तर प्रदेशचे आरोग्य महासंचालक के.के. गुप्ता यांनी विलगीकरण कक्षामध्ये मोबाइल वापरावर बंदी जाहीर केली होती.  मात्र, आता योगी सरकारने हा आदेश मागे घेतला असून, आता वॉर्डमध्ये रुग्ण मोबाइल वापरू शकणार आहेत. या नव्या आदेशानुसार, रुग्णांना अटींसह खासगी मोबाइल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोबाइल बंदीवरून अखिलेश यांची टीका कोरोनाबाधित रुग्णांनी विलगीकरण कक्षात मोबाइल नेऊ नये, या निर्णयावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली होती. विलगीकरण कक्षामध्ये ठेवले असताना मोबाइलमुळे रुग्णाला थोडा मानलिक आधार प्राप्त होतो. मोबाइलमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढतो, असं कारण देऊन सरकाने आपले गैरव्यवस्थापन लपवण्याचा प्रयत्न केला आहे. मोबाइतमुळे संसर्ग पसरत नाही. मोबाइल निर्जंतुकीकरण केल्यावर तला धोका राहणार नाही असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. हेही वाचा.. बंगाल-आंध्रसोडून आजपासून संपूर्ण देशात विमानसेवा सुरू, प्रवासी होतील क्वारंटाईन दरम्यान, उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या 2,493 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 3,433 संक्रमित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे 155 जणांनी प्राण गमावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात