JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान खात्याकडून इशारा, या भागात होणार मुसळधार पाऊस

जाहिरात

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 ऑगस्ट : राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात आता 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे. BREAKING: मुंबईत इमारत कोसळली, 1 ठार तर 4 जण गंभीर जखमी राज्यातील पाऊसमान - गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस - नगर, औरंगाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस - तर नंदूरबार, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदियात माञ सरासरी पेक्षा कमी पाऊस - पण 13 ते 17 ऑगष्टपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं या दुसऱ्या स्पेलमध्ये विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यातली धरणंही आता भरू लागली आहेत. कृष्णा खोऱ्यातील धरणं 75 टक्के तर भिमा खोऱ्यातील धरणं 65 टक्के भरलीत. उजनी मात्र अजूनही 30 टक्क्यांवर आहे तर जायकवाडी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याआधीच 60 टक्के भरलं आहे. त्यामुळे एका अर्थाने पावसाने यावेळी मराठवाड्याचा अनुशेषच भरून काढलाय असं म्हणावं लागेल. बदल्यांमध्ये सत्ताधीर मंत्र्यांकडून मलाईदार कमाई, चंद्रकांत पाटीलांचा गंभीर आरोप दरवर्षी साधारणपणे नगर, सोलापूर हे पर्जन्यछायेचे जिल्हे नेहमीच दुष्काळी राहतात. पण यावेळी नेमक्या याच जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे. हे यंदाच्या मान्सूनचं खास वैशिष्ठच म्हणावं लागेल. तसंच जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे आणि वरून सध्याच्या पावसाने बहुतांश धरणंही भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या