मुंबई, 11 एप्रिल : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सिंहीण आणि तिची छावे एका पाठोपाठ एक जात आहेत. या सिंहाची संख्या मोजताही येणार नाही इतकी आहे. तेवढ्यात समोरून एक गाडी येत असलेली या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. विचार करा त्या गाडीमध्ये बसलेल्यांच काय झालं असेल. इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत 48 हजार वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. त्याचप्रमाणे हजारोंनी रिट्वीट आणि कमेंट्स देखील केल्या आहेत. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि… ) सुशांत नंदा यांनी कॅप्शन दिली आहे की, ‘यामध्ये तुम्ही फक्त या छाव्यांना मोजत राहा. एकाचवेळी इतक्या साऱ्यांना पाहणं सुखद आहे. या व्हिडीओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो सिंहाचा कळप पाहून गाडीचा ड्रायव्हर एकदम गाडी थांबवतो. सिंहाच्या छाव्यांना जाण्याची तो वाट पाहत असतो. मात्र त्यांची रांग संपतच नाही आहे. रस्ता ओलांडून ते सर्वजण बाजूलाच असणाऱ्या गवतात जातात. सर्वात मजेशीर बाब म्हणजे हे सर्वजण एका रांगेत रस्ता ओलांडत आहेत. जणू काही त्यांच्या आईने त्यांना शिस्तीत चालण्यासाठी सांगितलं आहे.
सुशांत दास यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्यांनी त्या गाडीतील माणसाला नशिबवान म्हटलं आहे, ज्याला एकाचवेळी एवढे सिंह पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.