JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पाकिस्तानातून भारतात येणार 300 नागरिक, अटारी बॉर्डवरून येणार मायदेशी

पाकिस्तानातून भारतात येणार 300 नागरिक, अटारी बॉर्डवरून येणार मायदेशी

पाकिस्तानमध्ये (Pakistan) अडकलेल्या 300 भारतीयांचा देशात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्याचं काम भारतीय उच्चायुक्तांनी सुरू केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मे : देशात वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमणाखाली ‘वंदे भारत मिशन’ (Vande Bharat Mission) अंतर्गत जगभरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचं काम सुरू आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) अडकलेल्या 300 भारतीयांचा देशात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्याचं काम भारतीय उच्चायुक्तांनी सुरू केलं आहे. तर 300 भारतीयांपैकी बहुतेक काश्मीरचे विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली आहे. 15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत वंदे भारत मिशन अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचं काम वेगानं सुरू आहे. यात आता पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आणण्याच्या मार्गही मोकळा झाला आहे. असं म्हणतात की, गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्याची तयारी भारतीय उच्चायुक्तांनी केली आहे. या लोकांना अटारी सीमेवरून भारतात आणलं जाईल. पाकिस्तानातून भारतात येणारे बहुतेक लोक काश्मिरी विद्यार्थी आहेत. पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट पाकिस्तानमधील काश्मिरी विद्यार्थ्यांसह गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्रातूनही बरेच लोक उपस्थित आहेत. सरकारच्या प्रयत्नांनंतर या सर्व लोकांना भारतात आणण्यात आल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या