मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

शाळा सुरु व्हावी असं सळ्यांनाच वाटतं मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

शाळा सुरु व्हावी असं सळ्यांनाच वाटतं मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 24 मे : देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमणादरम्यान, महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य 15 शहरे आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिफ्टमध्ये वर्ग चालवणं, शाळेचे तास कमी करणं, सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं आणि क्रीडा उपक्रम राबवण्याच्या योजनांची माहिती दिली आहे. पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर शिक्षणमंत्री म्हणाल्या की, सामाजिक अंतरण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून त्यांना सांगायचं की, कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवणं. एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असेल अशा सूचना देणं. दरम्यान, शाळा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर हानिकारक परिणाम होईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे. परंतु मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमदध्ये याचा विचार होऊ शकत नाही. शिक्षणमंत्र्यांनी असं संकेत दिलं की "शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे". पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर खरंतर, कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. या संसर्गामुळे संपूर्ण देशात 3 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1.32 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाची नोंद झाली. यावेळी सर्व लोकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी जोर देण्यात येत आहे. सध्या सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा शिथिल केला आहे. लॉकडाऊनच्या 65 दिवसानंतर पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या