JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अरे देवा! मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, नेमका काय घडला प्रकार वाचा

अरे देवा! मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, नेमका काय घडला प्रकार वाचा

कुटुंबीयांनी मेथीची भाजी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला बेशुद्ध पडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कन्नौज, 01 जुलै : मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आणि बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नोज परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार या कुटुंबीयांनी मेथीची भाजी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला बेशुद्ध पडले. त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पोलिसांनी या प्रकऱणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका तरुणानं मजेमध्ये मेथीची भाजी आहे असं सांगून गांजा दिला होता. हे वाचा- एसटी महामंडळाने निवृत्तीनाथांचे फाडले तिकीट; वारकऱ्यांकडून वसूल केले 71 हजार! कन्नौज सदर कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी असल्याचं सांगून एक पिशवी दिली. त्यानंही कोरडी मेथीची भाजी आहे असं समजून भाजी बनवली आणि खाल्ली. संध्याकाळी मात्र या संपूर्ण कुटुबाची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती शेजारच्यांनी तातडीनं पोलिसात कळवली आणि बेशुद्ध पडलेल्या नितेशसह त्याच्या कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी भाजीचे सॅपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणाऱ्या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या