JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राज ठाकरेंनंतर सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी, म्हणाल्या...

राज ठाकरेंनंतर सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी, म्हणाल्या...

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र पाठवले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट : कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. लॉकडाउनची घोषणा होण्याच्या आधीपासूनच राज्यातील जीम, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. अनलॉक - 2 सुरू झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जीम सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारने जीम सुरू करण्याबद्दल मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र पाठवले आहे.’ कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे’ असं स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या

या पत्रात जीम मालकाने आपल्या अडचणीचा पाढाच वाचला आहे. मार्च महिन्यांपासून जीम बंद आहे. आम्ही जेवढी बचत केली होती. ती आतापर्यंत वापरली. आता बँकेचे हफ्ते, वीज बिल, जागेचे भाडे देणे अशक्य झाले आहे. जीम बंद असली तरी भाडे आणि विज बिल भरावेच लागत आहे. आमच्यावर आता भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा जीम मालकांने मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जीम चालकांनी कृ्ष्णकुंज निवासस्थानावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी, जर राज्यातील दारूचे दुकानं, मॉल उघडली जात असेल तर जीम उघडण्यास अडचण का आहे. तुम्ही जीम उघडा, ज्यांना यायचे ते येईल, बाकी पाहून घेऊ, असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होते. दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जीम सुरू करावे अशी मागणी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या