JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनाग्रस्तांना जगवणारा Ventilator च जीवघेणा ठरतोय?

कोरोनाग्रस्तांना जगवणारा Ventilator च जीवघेणा ठरतोय?

न्यूयॉर्कमध्ये ventilator असलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

तर देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही कमी करण्यात यश मिळालं असून त्याची टक्केवारी 2.04 एवढी झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 12 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (CoronaVirus) गंभीर रुग्णांवर उपचारासाठी जगभरातील सर्व देश अतिरिक्त वेंटिलेटरची (ventilators) व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी वेंटिलेटरचा वापर करणं टाळत आहेत. एपी न्यूज ने याबाबत वृत्त दिलं आहे. काही रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आलीत. वेंटिलेटरमुळे काही रुग्णांना नुकसान पोहोचू शकतं, असं डॉक्टरांना वाटतं. ज्यांचं फुफ्फुस नीट काम करत नाहीत अशा रुग्णांना वेंटिलेटर ठेवलं जातं. अशा रुग्णांच्या घशात एक ट्युब घातली जाते आणि ऑक्सिजन पोहोचवलं जातं. अशा गंभीर परिस्थितीत पोहोचलेल्या रुग्णांचा मोठ्या संख्येने मृत्यू होतो आहे. तज्ज्ञांच्या मते, श्वास घेण्यात गंभीर समस्या असलेल्या 40 ते 50 टक्के रुग्णांचा मृत्यू वेंटिलेटरवर होतो. मात्र न्यूयॉर्कमध्ये वेंटिलेटरवर असलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो आहे. अमेरिकन लंग असोसिएशनचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. अल्बर्ट रिजो यांनी अमेरिकेत सामान्यपेक्षा अधिक मृत्यू दर येत असल्याचं सांगितलं आहे. असेच काही रिपोर्ट चीन आणि ब्रिटनमधूनही आहेत. यूकेतील एका रिपोर्टनुसार अशा 66% तर वुहानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार 86% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही काळानंतर वेंटिलेटर रुग्णांना नुकसान पोहोचवत असावेत कारण त्यांच्या फुफ्फुसात लहान जागेत उच्च दबावात ऑक्सिजन पोहोचवलं जातं. टोरंटो जनरल हॉस्पिटलमधील श्वसनसंबंधी आजारांचे तज्ज्ञ डॉ. एडी फान म्हणाले, “वेंटिलेटर फुफ्फुसातील जखमेला अधिक बिघडवू शकतं, असं गेल्या काही दशकात दिसून आलं आहे. त्यामुळे याचा वापर करताना खबरदारी घ्यावी लागेल” कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या