Home /News /national /

अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

गेल्या दोन दिवसांपासून युरोप आणि अमेरिकेतील मृतांचा आकडा कमी झाला आहे. मात्र आशियाई देशांमध्ये आता कोरोना वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे.

    नवी दिल्ली, 13 एप्रिल : जगात गेल्या काही दिवसांपासून युरोप आणि अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृतांची संख्या सगळ्यात जास्त होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून युरोप आणि अमेरिकेतील मृतांचा आकडा कमी झाला आहे. मात्र आशियाई देशांमध्ये आता कोरोना वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाची 72 हजार 616 नवीन प्रकरणे समोर आली. यामुळे आता 18 लाख 50 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 24 तासांत मृतांचा आकडा 5 हजार 414 होता. यामुळे एकूण मृतांची संख्या 1 लाख 14 हजारहून अधिक झाली आहे. यात अमेरिकेत सर्वात जास्त मृतांची संख्या आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतील मृतांची संख्या कमी झाली आहे. स्पेन, इटली, ब्रिटन आणि इराण या कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्येही पूर्वीच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. वाचा-रस्त्यावर तुफान वेगात कारने फिरत होता नकली IAS, पोलिसांनी चौकशी करताच ओकला सत्य ट्रम्प यांनी आपत्तीकडे केले दुर्लक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साथीच्या आजाराच्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला परंतु याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. उलट अर्थव्यवस्थेकडे जास्त लक्ष केंद्रित केले. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा सहाय्यक आणि सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना साथीच्या रोगाचा आणि त्याच्या परिणामाबद्दल चेतावणी दिली होती, परंतु ट्रम्प यांनी या संकटाला कमी लेखले, त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला. वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक अमेरिकेत मृतांचा आकडा कमी अमेरिकेत रविवारी 27 हजार 523 नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर देशात संसर्ग होण्याची एकूण प्रकरणे 5 लाख 60 हजार 402 पर्यंत वाढली आहेत. येथे रविवारी या संसर्गामुळे 1528 लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर एकूण मृत्यूची संख्या 22 हजार 105 वर गेली आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 758 लोकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांनी, ही संख्या फारशी कमी नाही परंतु त्यात थोडी कमतरता आहे. न्यूयॉर्क राज्यात कोव्हिड19मुळे 1 लाख 80 हजार 458 पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत आणि मृतांचा आकडा 9 हजार 385 आहे. वाचा-नागपुरमध्ये कोरोना वाढतोय, एका दिवसांत रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर भारतात 9 हजारांच्या जवळ प्रकरणे रविवारी देशात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ नऊ हजारांवर गेली आणि गेल्या 24 तासांत संसर्गाचे 918 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी शनिवारी एक हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. आरोग्य देखरेखीसाठी वाढती मागणी असतानाही केंद्र सरकारने म्हटले आहे की, ते सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविड -19ची चाचणी क्षमता वाढवित आहे. राज्यांकडून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे, आत्तापर्यंत देशात कोरोना विषाणूची 8,933 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 981 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या