JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनाच्या परिस्थितीत शिवभोजन थाळीसंदर्भात राज्य कॅबिनेटचा महत्त्वाचा निर्णय

कोरोनाच्या परिस्थितीत शिवभोजन थाळीसंदर्भात राज्य कॅबिनेटचा महत्त्वाचा निर्णय

एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि व्यापार ठप्प असल्यामुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशात सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजन थाळीचा दर 5 रुपये असणार असल्याचा निर्णय राज्य कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. इतकंच नाही तर मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को. ऑप. सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय - राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. - कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचं आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग असं नामकरण करण्यात आलं आहे. - आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी ‘कोरोना फक्त पहिली लहर आहे, दीर्घकाळासाठी जगाल परिणाम भोगावे लागतील’, चीनची धमकी - शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये एवढा करणे - एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा 2 राज्यात राबवणं म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय खरंतर कोरोनाच्या राज्याच्या तिजोरीत सध्या खळखळाट आहे. अशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आता प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोकण या विभागीय मंडळांतर्फे दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे: पोलिसांशी झालेल्या वादानंतर जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल, एकाचा मृत्यू कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नाही. सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून ‘म्हाडा’तर्फे दिलासा देणारा सदर निर्णय घेण्यात आला आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या