'कोरोना तर फक्त पहिली लहर आहे, दीर्घकाळासाठी जगाल परिणाम भोगावे लागतील', चीनची धमकी

'कोरोना तर फक्त पहिली लहर आहे, दीर्घकाळासाठी जगाल परिणाम भोगावे लागतील', चीनची धमकी

अमेरिका सगळीकडे आपला प्रभाव वाढवत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला फटका बसेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै : अमेरिकेकडून दबाव वाढल्यानंतर चीनने संपूर्ण जगाचं नुकसान होईल अशी धमकी दिली आहे. चिनी सरकार-नियंत्रित वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकीय लेखात असं म्हटलं आहे की, सर्व मोठ्या देशांना अमेरिका चीनविरूद्ध भडकवत आहे आणि त्यांच्या बाजूने उभी करत आहे. पण याचा परिणाम वाईट होईल असं चीननं म्हटलं आहे.

अमेरिका सगळीकडे आपला प्रभाव वाढवत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला फटका बसेल. ज्या देशांशी चीनचा प्रादेशिक वाद आहे त्या देशांना अमेरिका पाठिंबा देत आहे. पाश्चात्य आणि आशियाई देशांना अमेरिका चीनच्या विरोधात करण्यासाठी भडकवत​आहे. असं चीनच्या इंग्रजी वृत्तपत्रात म्हटलं आहे.

चिनी वृत्तपत्रानं असंही म्हटलं आहे की, अमेरिकेच्या बरोबरीलाच चीनचा बाजार आहे. जवळपास 100 देशांशी चीनचे व्यापार संबंध आहेत, परंतु असे संबंध बिघडवण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे. जगाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.

पुणे: पोलिसांशी झालेल्या वादानंतर जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल, एकाचा मृत्यू

'जगाला मोठ्या काळासाठी नुकसान सहन करावं लागेल. सध्या सुरू असलेल्या कोविड साथीच्या रोगाचीतर ही पहिली लाट आहे. साथीच्या रोगाचा प्रकोप झाल्यानंतरही अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय मदत बंद केली आहे. याचा मोठा परिणाम सगळ्यांना भोगावा लागणार आहे.' असंही चीननं म्हटलं आहे.

अमेरिका चीनविरूद्ध मोठी युक्ती लढवत आहे. यामुळे पुढच्या काळात वाद आणखी वाढू शकतो. यामुळे युद्धाचा धोकाही आहे. बर्‍याच देशांना याचा मोठा त्रास होईल असं चीनच्या वृत्तपत्रात लिहण्यात आलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

Published by: Manoj Khandekar
First published: July 8, 2020, 6:18 PM IST

ताज्या बातम्या