पुण्यात धक्कादायक प्रकार; पोलिसांशी झालेल्या वादानंतर जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल, एकाचा मृत्यू

पुण्यात धक्कादायक प्रकार; पोलिसांशी झालेल्या वादानंतर जोडप्यानं उचललं टोकाचं पाऊल, एकाचा मृत्यू

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप...

  • Share this:

पुणे, 08 जुलै : पोलिसांशी झालेल्या वादानंतर दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर एक इथं कंन्टेनमेंट झोन असल्याने गावात गाडी सोडण्याच्या कारणावरून पोलिसांसोबत दाम्पत्याचा वाद झाला. त्यानंतर या पती आणि पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनुजा शिंगोटे आणि रोहिदास शिंगोटे असं दाम्पत्याचं नाव असू दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत विषामुळे पत्नीचा मृत्यु झाला असून पती रोहिदास शिंगोटे यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यानवर त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

हा सर्व प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला. पोलिसांनी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. सबंधित प्रकरणी आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कंन्टेनमेंट झोन असल्यामुळे गाडीला गावात जाण्यास विरोध केला. पण शिंगोटे दाम्पत्याने पोलिसांशी वाद घातला. यामध्ये पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पण अनुजा यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

संपादन - रेणुका धायबर

Published by: Manoj Khandekar
First published: July 8, 2020, 5:20 PM IST
Tags: #Pune

ताज्या बातम्या