JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पार्थ यांनी केली होती सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी, रोहित पवार म्हणाले...

पार्थ यांनी केली होती सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी, रोहित पवार म्हणाले...

‘विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे पण त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे द्यावे’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांतसिंह राजपूत  आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पण, पार्थ पवार यांच्या या मागणीवर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. अलीकडे रोहित पवार यांनी ‘दैनिक लोकमत’ अहमदनगरच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांने केलेल्या मागणीचा राजकीय अर्थ काढू नये, असं म्हटलं आहे. भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, VIDEO ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणी पार्थ याने सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी या प्रकरणाचा चांगला तपास व्हावा असं त्यांनी सुचवले आहे. पण, याचा अर्थ त्यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आणि लगेच सीबीआयकडे तपास द्यावा असं काही नाही’ असंही रोहित पवार म्हणाले. सुशांत प्रकरणी भाजप विनाकारण राजकारण करत आहे. विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे पण त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे द्यावे आणि माध्यमांमध्ये जाहीर करावे, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. 27 जुलै रोजी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

‘सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी संपूर्ण देश, विशेषत: तरूणाईची अपेक्षा आहे. ही भावना लक्षात घेत याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे,’ असं ट्वीट सुद्धा पार्थ पवार यांनी केलं होतं. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांनी आपल्या या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या