JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पुण्यात कोरोना लसीचा दुसरा टप्पा सुरू, या रुग्णांनावरच करणार चाचणी

पुण्यात कोरोना लसीचा दुसरा टप्पा सुरू, या रुग्णांनावरच करणार चाचणी

बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर इथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 26 ऑगस्ट : पुण्यात आज सिरम इनस्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला. भारती हॉस्पिटलमध्ये हा पहिला डोस दिला गेला. या मानवी चाचणीसाठी स्वत:हून पुढे आलेले 2 स्वयंसेवक आणि डॉक्टरांनी याबद्दल माहिती दिली आहे. खरंतर, कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच त्यावरील लस येणार या बातमीने आशेचा किरण निर्माण झाला आहे. बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर इथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली. याचे काही फोटोही समोर आले आहेत. भारती हॉस्पिटल इथे ऐकून 350 स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. 18 वर्षावरील निरोगी स्त्री – पुरुष यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवकास निवडताना प्रथमतः त्यांची कोविड आर.टी.पीसीआर व अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व तापसण्या निगेटीव्ह असलेल्या स्वयंसेवकास लस देण्यात येणार आहे. अशा सुदृढ स्वयंसेवकास निवडण्यात येणार आहे. एका क्षणात गायब झाला भला मोठा पूल, पाहा धक्कादायक अपघाताचे भीषण PHOTOS सदरील वैद्यकीय चाचणीसाठी भारती हॉस्पिटल व सिरम इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सहकार्य करार झालेला आहे. या संशोधनासाठी सिरम इन्स्टिट्यूट हे मुख्य प्रायोजक असून इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) हे सहप्रायोजक आहेत. भारती हॉस्पिटल इथे मुख्य अन्वेषक म्हणून डॉ. संजय ललवाणी हे काम पाहणार आहेत. अजित पवारांनी घेतला एक नंबर निर्णय, राज्यातील जुन्या वृक्षांसंदर्भात मोठं पाऊल भारती हॉस्पिटल गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून लहान मुलांच्या लशीच्या संशोधनासाठी सिरम इन्स्टिट्यूट व वेगवेगळया संस्थाबरोबर काम करत आहे. संशोधनासाठी वेगळा विभाग कार्यरत असून डॉक्टर्स, संशोधक, सोशल वर्कर यांची टीम कार्यरत आहे. ही लस दिलेल्या स्वयंसेवकास पुढील 6 महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही स्वयंसेवकास यामध्ये सामील व्हायचे असल्यास 020-40 555 555 विस्तारीत क्रमांक 263 यावर संपर्क साधावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या