ठाणे, 27 एप्रिल: गेल्या 48 तासांत मुंबईत कोरोना विषाणूने 3 पोलिसांचा बळी घेतला आहे. कुर्ला वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (वय- 56) यांचं सोमवारी कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना निधन झालं. तर संरक्षण शाखेतील चंद्रकांत पेंदुरकर आणि वाकेला पोलिस स्टेशनचे संदीप सुर्वे यांचे रविवारी करोनामुळे निधन झालं होतं. कोरोनामुळे पोलिस दलातील 3 सहकारी गमावल्याचं ऐकून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाही रडू कोसळलं. विशेष म्हणजे या पोलिस अधिकाऱ्याने कोरोनावर विजय मिळवला आहे. त्याला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस मधुकर कड यांनी कोरोनाला धोबीपछाड दिला आहे. मधुकर कड यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ते मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत होते. हेही वाचा… पुण्यात आठवड्याभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ, 1300 वर गेला आकडा नाशिक येथे ते आपल्या गावी जात असताना ठाण्यातील आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणे पोलिसांनी त्यांचे स्वागत केलं. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवत त्यांचे अभिवादन केलं. आपलं स्वागत पाहून आणि कोरोनाने आपले 3 सहकारी गमावल्यानं मधुकर कड यांना रडू कोसळलं. यावेळेस पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे हे देखील उपस्थित होते. त्यांनी या सर्व स्वागताची तयारी केली होती. स्वागता नंतर मधुकर कड हे आपल्या गावी नाशिकला रवाना झाले. हेही वाचा… CM उद्धव ठाकरे यांच्यासाठी मंत्रिमंडळाने घेतला हा मोठा निर्णय, पेच सुटणार? दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्याच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. संपादन- संदीप पारोळेकर