JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गावी परतणाऱ्या पाहुण्यांमुळे रायगडकर भयभीत, हजारो लोकं पोहोचले पायी!

गावी परतणाऱ्या पाहुण्यांमुळे रायगडकर भयभीत, हजारो लोकं पोहोचले पायी!

पनवेल उरण, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातही कोरोनाची दहशत वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहन जाधव, प्रतिनिधी  रायगड, 19 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई हे कोरोनासाठी हॉटस्पॉट शहर ठरले. त्यामुळे मुंबईतून आपल्या गावी परतणाऱ्या लोकांविषयी गावकरी भयभीत झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे चाकरमानी रायगडमध्ये आजपर्यंत लाखाहून अधिक चाकरमानी जिल्ह्यात पायी चालत आले आहे. रायगड  जिल्हा हा मुंबईच्या अगदी नजीक असून जिल्ह्यातले नागरिक रोजगारानिमित्त मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत. हेही वाचा - महाराष्ट्रासाठी सुखावणारी बातमी, ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त मात्र, ते आता परत पायी चालत गावी प्रवास करीत आहेत. रायगड जिल्ह्यात 1 लाख 3026 चाकरमानी मुंबईतून अलिबाग, मुरुड, तळा, महाड, श्रीवर्धन या ठिकाणी पोहोचले आहेत. अजूनही चाकरमनी गावाकडे पायी प्रवास करीत आहेत. पनवेल उरण, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातही कोरोनाची दहशत वाढली आहे. हेही वाचा - … आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL रायगड जिल्ह्यात मुंबई, राज्यातून, परराज्यातून आणि परदेशातून नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे. यामध्ये अलिबाग 12611, कर्जत 698, खालापूर 1472, पेण 2821, पनवेल 172, पोलादपूर 7477, महाड 12424, माणगाव 18329, म्हसळा 14208, मुरुड 4107, सुधागड 8037, श्रीवर्धन 6553, रोहा 5056, तळा 8547, उरण 514 असे एकूण 1 लाख 3 हजार 26 नागरिक संचारबंदी काळात जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सदरची माहिती ही जिल्हा परिषदेने संकलित केलेली आहे. यावर जिल्हा प्रशासनाने अधिक खबरदारी घेत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या