महाराष्ट्रासाठी सुखावणारी बातमी, 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त

महाराष्ट्रासाठी सुखावणारी बातमी, 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त

पुढच्या काही दिवसात पुन्हा कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव करून नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

  • Share this:

लातूर, 19 एप्रिल : देशभरात कोरोनाचे संकट असताना लातूर जिल्ह्यामध्ये मात्र गेल्या काही दिवसापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र हरियाणा येथून निलंगा येथे आलेले मूळ आंध्रप्रदेश येथील आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यांचा प्रथम अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्या सर्व आठही रुग्णांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.

सुरुवातीच्या आठही कोरोनाबाधितांचा अहवाल निगेटव्हि आल्याने लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. शिवाय लातूर जिल्हा देखील कोरोनामुक्त झाल्यामुळे आता लातूरदेखील ग्रीन झोनमध्ये येण्यास सज्ज झालं आहे. मात्र असं असलं तरी पुढच्या काही दिवसात पुन्हा कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव करून नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

संगमनेर तालुकाही कोरोनामुक्त

नगर जिल्ह्यातूनही एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 दिवसांनी केलेल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आज नगरमधून या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

संगमनेर मध्ये पुढील 14 दिवस केलं जाणार चौघांना क्वारंनटाईन

कोरोनाच्या चाचण्या करण्यात महाराष्ट्र आघाडीवर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या (corona testing) वाढवल्या असून आता कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्यच सर्वात आघाडीवर आहे. आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) जाहीर केलेल्या आकडेवारतून हा खुलासा झाला आहे.

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक दिसत आहे. महाराष्ट्राने टेस्टिंगमध्ये साठ हजारांचा टप्पा गाठला आहे. त्या तुलनेत इतर राज्ये कुठेच नाहीत. चाचण्या घेण्यात आपल्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशचा लागतो. रँपिड टेस्टिंगचं घोषणा करणारं केजरीवालांचं दिल्ली तर थेट सातव्या क्रमांकावर आहे. तर सहावा क्रमांक केरळचा लागतो.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 19, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या