JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बाल्कनीतून दीड वर्षांचा चिमुकला कोसळला, अंगावर शहारे आणणारा धक्कादायक VIDEO

बाल्कनीतून दीड वर्षांचा चिमुकला कोसळला, अंगावर शहारे आणणारा धक्कादायक VIDEO

निरागस मुलाच्या विव्हळण्याच्या आवाजाकडेही बराचवेळ रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी लक्ष दिलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पटना, 20 मे : कोरोनाच्या महासंकटात आणखी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बाल्कनीत खेळणारा लहान मुलगा तोल जाऊन खाली कोसळला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एकीकडे संवेदनशीलता आणि माणुसकीचं दर्शन दाखवणारे अनेक व्हिडीओ येत असताना दुसरीकडे रस्त्यावर पडलेल्या चिमुकल्याकडे येणारे जाणारे लोक पाहातही नाहीत. हा संपूर्ण प्रकार भीषण आहे. आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता. दीड वर्षांच्या चिमुकला खेळताना बाल्कनितून अचानक खाली कोसळतो. आजूबाजूनं येणारी जाणारी वाहनंही त्याच्याकडे साधं बघतही नाही. हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आपण इतके स्वार्थी आणि संवेदनाहीन झालो आहोत की निरागस मुलाच्या विव्हळण्याच्या आवाजाकडेही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी लक्ष दिलं नाही. हे वाचा- धक्कादायक! माणुसकी हरवली, लिफ्टच्या बहाण्याने मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलीचं…

हा व्हिडिओ पाटणाच्या भूतनाथ रस्त्यावरचा असल्याची माहिती मिळाली आहे. बराच वेळ मुलगा वेदनेमुळे ओरत होत नंतर एका माणसाचं लक्ष गेलं त्यानं आवाज दिल्यावर लोक जमा झाले. या सर्वांनी मिळून चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या ह्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हे वाचा- चिकन खायची झाली इच्छा, कोंबडी मिळाली नाही म्हणून मुलींवर चालवली कुऱ्हाड संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या