चिकन खायची झाली इच्छा, कोंबडी मिळाली नाही म्हणून मुलींवर चालवली कुऱ्हाड

चिकन खायची झाली इच्छा, कोंबडी मिळाली नाही म्हणून मुलींवर चालवली कुऱ्हाड

पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांची पत्नी रामबाईविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

  • Share this:

रायपूर, 20 मे : कितीही संकटं आली तरी आई मुलांवर कधीही येऊ देत नाही पण चक्क नशेत धुंद असलेल्या आईनंच मुलींवर कुऱ्हाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नशेत धुंद असलेल्या आईला चिकन खाण्याची तीव्र इच्छा झाली. आईची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिनं आपल्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजपूर जिल्ह्यातील प्रेमनगर इथे कविलास त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहातो. सोमवारी बाजार खेरीदी केल्यानंतर संध्याकाळी त्यांनी चिकन बनवलं रात्री एकत्र जेवण केल्यानंतर दोन्ही मुली झोपायला गेल्या. रात्री उशिरा कविलास आणि त्याची पत्नी दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दोघांनाही दारूसोबत चिकन खाण्याची तीव्र इच्छा झाली.

हे वाचा-जेसीबीसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळला

पती-पत्नी दोघांनीही चिकन देण्यासाठी मुलींना हाका मारल्या. मात्र दोन्ही मुली गाढ झोपेत होत्या. थोड्या वेळाने कविलासही मद्यपान करून झोपी गेला. त्यानंतर आरोपी महिलेनं उठून चार कोंबड्यांचा बळी दिला आणि चिकन बनवण्यासाठी मुलींना आवाज देऊ लागली. दिवसभऱ काम करून थकल्यामुळे मुलींना जाग आली नाही. अनेकवेळा हाका मारूनही मुली उठल्या नाहीत या रागातून महिलेनं पोटच्या मुलींवर कुऱ्हाड चालवली.

मुलींचे बळी घेतल्यानंतर मद्यधुंत अवस्थेत असलेल्या महिलेला आपण काय केलं याची जाणी होईपर्यंत खूप उशीर झाला होता. कविलासने हा सगळा प्रकार पाहून पोलीस स्थानक गाठले. कविलास यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांची पत्नी रामबाईविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हे वाचा-भीषण अपघात, सोलापूर-धुळे महामार्गवर इंधनाच्या टँकरचा स्फोट, ड्रायव्हरचा कोळसा!

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2020 01:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading