प्रशांत मोहिते, नागपूर, 31 जानेवारी : दुचाकी शिकताना नियंत्रण सुटल्यामुळे नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नागपूरच्या रामसुमेरनगरात घडली. या दुर्घटनेत डोक्यावर हेल्मेट नसल्याने नवविवाहितेला गंभीर दुखापत झाली. परिणामतः सुखी संसाराची स्वप्ने पाहण्याआधीच या नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला. शिवानी युवराज वाणी (वय- 20) असे नवविवाहितेची नाव आहे. शिवानी हिचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली. दोन-तीन दिवसांपासून माहेरच्या मंडळींसोबत आनंदात मुक्कामाला होती. तिला दुचाकी चालवणे शिकायचे होते. त्यामुळे शेजाऱ्यांना गाडी मागितली. अनुभव नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिला मनाई केली. परंतु शिवानीने प्रॅक्टिस करणार असल्याचे सांगितले. हेही वाचा- त्रास देते म्हणून मुलानेच दिली सावत्र आईची सुपारी, मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार! सायंकाळी 7 वाजता घराजवळच गाडी चालवत असतानाच अचानकपणे अनियंत्रित होऊन रेल्वे परिसराच्या भिंतीला धडकली. यात शिवानीचे डोके जोरात भिंतीवर आदळले. मोठी जखम झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात नेले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शिवानीच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. हेही वाचा- विकृतीचा कळस! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला लाडक्या पत्नीला बेदम मारहाण, मन सुन्न करणारा VIDEO या घटनेचा बोध घेत शांती नगर पोलिसांनी आणि मृतक शिवानीच्या घरचा लोकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे अस आव्हान केलं असून नागपुरात सध्या सर्रासपणे सिग्नल तोडून आणि अजूनही हेल्मेट न वापरणारे लोक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशातच वाहतूक नियम आणि वाहतूक पोलिसांनी अशा घटना घडू नयेत, यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.