मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विकृतीचा कळस! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला लाडक्या पत्नीला बेदम मारहाण, मन सुन्न करणारा VIDEO

विकृतीचा कळस! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला लाडक्या पत्नीला बेदम मारहाण, मन सुन्न करणारा VIDEO

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच असं काही घडलं की संपूर्ण शहर हा घटनेमुळे हादरून गेला आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच असं काही घडलं की संपूर्ण शहर हा घटनेमुळे हादरून गेला आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच असं काही घडलं की संपूर्ण शहर हा घटनेमुळे हादरून गेला आहे.

मंडी, 28 जानेवारी : लग्नाचा वाढदिवस (Marriage Anniversary) म्हटलं की जोरदार उत्साह असतो. खास सेलिब्रेशन असतं. पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच असं काही घडलं की संपूर्ण शहर हा घटनेमुळे हादरून गेला आहे. नवरा आणि सासूने सूनला निर्दयतेने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पती आणि सासूला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने मारहाणीनंतर महिलेच्या शरीरावर झालेल्या जखमांचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे.

वर्षभरापूर्वी झालं होतं लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, मंडईतील थलाट येथे राहणाऱ्या खुशबूचे 26 जानेवारी 2019 रोजी पानारसा येथे राहणाऱ्या चिरंजीशी लग्न झाले होते. असा आरोप आहे की, लग्नानंतर सासरच्यांनी खुशबूवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. सासरच्यांनी केलेल्या छळामुळे नाराज खुशबू जेव्हा पोलीस तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा तिथे सासरच्यांनी घरगुती बाब सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या...

26 जानेवारी 2020 रोजी, जेव्हा खुशबू आणि चिरंजी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा चिरंजी आणि तिची आई इंद्रदेवी यांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. असा आरोप केला जात आहे की, मुलगा आणि आईने खुशबूला बेदम मारहाण केली. आधी तिचं तोंड बांधले गेले आणि नंतर तिच्या तोंडावर पट्ट्याने मारहाण केली. 26 जानेवारी रोजी रात्री 27 जानेवारीला ही घटना घडल्यानंतर खुशबूने तिच्या आईला जाऊन संपूर्ण परिस्थिती सांगितली. खुशबूच्या अंगावरील जखमांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याचबरोबर ऑटो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही दाखल केली आहे.

या प्रकरणाची पुष्टी देताना एसपी (मंडी) गुरदेव शर्मा म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि सासू यांना भादंविच्या कलम 498ए आणि 323 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्याने सांगितले.

First published:

Tags: Domestic violence