JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं दडी मारली आहे.

जाहिरात

त्यातच आता पावसाळा सुरु झाल्याने दरवर्षी उद्भवनाऱ्या साथीही येत असल्याने जास्त काळजी घ्येण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जुलै: मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं दडी मारली आहे. राज्यात पुढच्या 48 तासांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा पुढचे दोन दिवस चांगला जोर राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये पावसानं जोर धडला होता मात्र त्यानंतर दडी मारली. पाऊस गेल्यानं तापमानात वाढ झाली असून उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसानं विश्रांती घेतली असली तरीही गुरुवारी पुन्हा एकदा पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. हे वाचा- शरद पवारांसह उदयनराजे भोसले घेणार खासदारकीची शपथ, ही आहे संपूर्ण यादी उत्तर भारतात सक्रिय झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार तर शुक्रवारी रिमझिम पावसाची शक्यता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतीसाठी आतूरतेनं वाट पाहणाऱ्या बळीराजाला पावसामुळे दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या