JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

पुढच्या 5 दिवसांमध्ये मान्सून हा भारतात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : देशावर कोरोनाचं सावट असताना आता मान्सूनचीही चाहूल लागली आहे. पुढच्या 5 दिवसांमध्ये मान्सून हा भारतात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारपर्यंत म्हणजेच 16 मेपर्यंत दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य राहील. त्यानुसार 2020 मध्ये 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. 1 जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक टीका स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून 3 ते 7 दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही 15 जुलैऐवजी 8 जुलैला मान्सून दाखल होईल. 17 मेनंतर होणार मोठे बदल, मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यंदाचा मान्सून 29 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोबरपर्यंत मुक्काम करेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. धक्कादायक! एका क्षणात झाला दोन भावांचा मृत्यू, जनावरांना पाणी आणायला गेले पण… संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या